थायलंडवरून पोरी आणल्या अन् मसाज पार्लरमध्ये.., ठाण्यातील धक्कादायक प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाणे जिल्ह्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं दोन थायलंडच्या तरुणींवर देहविक्री व्यवसाय करून घेतला जात होता.
ठाणे: ठाणे जिल्ह्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं दोन थायलंडच्या तरुणींवर देहविक्री व्यवसाय करून घेतला जात होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापेमारी केली. यात पोलिसांनी दोन थायलंडच्या तरुणींची सुटका केली असून एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित महिलेनं पैशाचं आमिष दाखवून थायलंडहून दोन तरुणींना भारतात आणलं होतं. दोघींनी मसाज पार्लरमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र इकडे जबरदस्तीने त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे जी महिला हे रॅकेट चालवत होती, ती देखील थायलंडची नागरिक आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. शुक्रवारी, २८ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती दिली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडच्या तरुणींना पैशाच्या मोठ्या आमिषाने भारतात आणलं जात होतं. त्यांना सुरुवातीला मसाज पार्लरमध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन दिलं जात होतं, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून देहविक्री व्यवसाय करून घेतला जात होता. या माहितीच्या आधारावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तत्काळ कारवाईची योजना आखली.
बनावट ग्राहकाच्या मदतीने कारवाई
advertisement
पोलिसांनी घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागातील एका गृहसंकुलात एका बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा टाकला. यावेळी देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या २८ वर्षीय थायलंडच्या महिलेला रंगेहाथ अटक केली. यावेळी पीडित थाई महिलांची सुटका करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या देहविक्री रॅकेटमुळे ठाण्यातील परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आता या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास करत आहेत.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 9:55 AM IST









