Thane Crime : ठाणे हादरलं! वाहन व्यावसायिकाने केलं असं की घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली; घडलं काय?

Last Updated:

Thane News : ठाणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जिथे एका व्यवसायिकाने कर्जाच्या तणावामुळे जीवन संपवले आहे.

News18
News18
ठाणे : व्यावसायिकाने कर्जाच्या तणावामुळे जीवन संपवण्याची धक्कादायक घटना घडली. कासारवडवली येथील 30 वर्षीय वाहन व्यावसायिक साजीद मुल्ला यांनी आर्थिक दबावामुळे गळफास घेतला. साजीदवर हजरत इरफान नोडे (वय35) यांच्याकडून नऊ लाख रुपयांच्या कर्जासाठी सतत तगादा लावल्याचा आरोप आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार,साजीदच्या पत्नी अरबिना ( वय 26) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत आरोप केला की, साजीदने या त्रासामुळे आत्महत्या केली आहे शिवाय काही नातेवाइकांच्या मते साजीदने कर्ज फेडले होते. पण तगादा आणि सततचा दबाव यामुळे त्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
advertisement
कासारवडवली पोलीस स्टेशनने घटनास्थळी पाहणी करून हजरत इरफान नोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साजीदच्या आत्महत्येची ही घटना स्थानिक समाजात धक्कादायक ठरली असून आर्थिक ताण आणि कर्जाच्या दबावामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याची उघड दर्शवते.
या घटनेने ठाणे परिसरातील वाहन व्यावसायिकामध्ये चिंता निर्माण केली आहे कारण आर्थिक दबावाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम गंभीर असू शकतो. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी अशा घटनांवर लक्ष ठेवून कर्जदारांवरील तगाद्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Crime : ठाणे हादरलं! वाहन व्यावसायिकाने केलं असं की घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली; घडलं काय?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement