Beed Crime : 7 तास युक्तिवाद, 21 व्हिडिओ! वकिलांनी लॅपटॉप उघडला अन् धनंजय देशमुख कोर्टाबाहेर येऊन ढसाढसा रडले!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Dhanajay Deshmukh cries Outside courtroom : संतोष देशमुख यांना कसं मारलं याचे व्हिडीओ आणि फोटो होते. हा भयंकर प्रसंग पाहून पत्नी अन् भावाला रडू कोसळलं.
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे सध्या राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद दिसून आले होते. अशातच आता या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी लॅपटॉप खंडपीठाचे न्या.सुशील घोडेस्वार यांना दिला अन् इतके धनंजय देशमुख ढसाढसा रडत कोर्टाच्या बाहेर पडले.
पत्नी अन् भावाला रडू कोसळलं
जामिनावर सुनावणी प्रसंगी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी देशमुख यांच्या हत्याकांडाचे 21 व्हिडिओ खंडपीठाचे न्या सुशील घोडेस्वार यांना दाखविण्यासाठी 12 डिसेंबर रोजी लॅपटॉप दिला. त्यात संतोष देशमुख यांना कसं मारलं याचे व्हिडीओ आणि फोटो होते. हा भयंकर प्रसंग पाहून पत्नी अन् भावाला रडू कोसळलं. संतोष देशमुख यांची पत्नी आणि भाऊ धनंजय देशमुख कोर्टाच्या बाहेर आले. त्यावेळी इतर सहकार्यांनी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला.
advertisement
दोन कोटींच्या खंडणीची मागणी
सुनावणीवेळी सोबत असलेल्या नातेवाईक, वकिलांसह त्यांचे चुलत बंधू जगदीश देशमुख यांनी दोघांना आधार दिला. यावेळी कोर्टात साक्षीदार, सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकॉर्डिंग, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला गेला. हत्येवेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात संवाद झाला होता, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. कराड याने अवादा कंपनीकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली. सुदर्शन घुलेला कंपनी बंद करण्यास पाठविले. घुलेने दलित वॉचमनला जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केली.अधिकाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा युक्तीवाद करण्यात आला.
advertisement
कराड फोनवरून मारेकऱ्यांना सूचना देत होता
संतोष देशमुख यांनी गावातील युवकांचा रोजगार जाईल म्हणून यास विरोध केला. आपल्या मागणीआड येणारास आडवा करा, असं कराड याने घुलेला सांगितले. त्यानंतर देशमुखला उमरी टोल नाक्यावरून उचललं. देशमुख यांच्या हत्येच्या वेळी कराड आणि घुले यांच्यात संवाद सुरू होता. कराड फोनवरून मारेकऱ्यांना सूचना देत होता. हा पुरावा गुन्हे अन्वेषणविभागाने जमा केल्याची माहिती वकिलांनी कोर्टात दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 9:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : 7 तास युक्तिवाद, 21 व्हिडिओ! वकिलांनी लॅपटॉप उघडला अन् धनंजय देशमुख कोर्टाबाहेर येऊन ढसाढसा रडले!










