Thane Shocking News : शेअर रिक्षेतून प्रवास करताय? ठाण्यातील 'या' घटनेतून वेळीच व्हा सावधान
Last Updated:
Thane Crime : ठाण्यात शेअर रिक्षातून प्रवास करताना एका सहप्रवासी महिलेने वरिष्ठ लिपिक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हातचालखीने चोरली. या प्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे : ठाणे शहरात शेअर रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका वरिष्ठ लिपिक महिलेची सोनसाखळी चोरण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रिक्षातील सहप्रवासी महिलेने हातचालखी करत ही चोरी केल्याचे उघड झाले असून याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे.
शेअर रिक्षेतील प्रवास पडला महागात
बाळकुळ परिसरात राहणाऱ्या प्रज्ञा मगर (वय 58) या ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (14 जानेवारी) सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मकर संक्रांतचा दिवस असल्याने त्यांनी गळ्यात सोन्याची साखळी त्यावर हिऱ्याचे पेंडल तसेच काही आर्टिफिशल दागिने परिधान केले होते.
advertisement
सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी बाळकुम नाका बस थांब्याजवळून शेअर रिक्षा पकडली. रिक्षा पोलिस आयुक्तालयाच्या दिशेने जात असताना त्यात आधीच काही प्रवासी बसले होते. काही अंतर गेल्यानंतर तीन वर्षांच्या मुलासह एक महिला रिक्षात चढली. प्रवासादरम्यान त्या महिलेने प्रज्ञा मगर यांच्या जवळ बसत संधी साधली आणि अत्यंत चलाखीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली.
advertisement
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रिक्षातून उतरल्यानंतर गळ्यातील साखळी नसल्याचे लक्षात येताच प्रज्ञा मगर यांनी तत्काळ कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी शेअर रिक्षातून प्रवास करताना दागिने घालताना सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 2:33 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Shocking News : शेअर रिक्षेतून प्रवास करताय? ठाण्यातील 'या' घटनेतून वेळीच व्हा सावधान









