महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने आता राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची नाराजी पाहायला मिळत आहे.पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले. राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात नाराजांनी धडक दिली. एका इच्छुक महिला उमेदवाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला.आम्ही रक्ताचे पाणी केले आणि पक्षाचे काम केले. मात्र, इतरांना सहज उमेदवारी कशी काय दिली, असा सवाल इच्छुकांनी केला.
Last Updated: Dec 30, 2025, 14:30 IST


