छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील खिर्डी गावातील प्रगतशील शेतकरी दत्तू धोत्रे हे 2012 पासून हळदीचे उत्पादन घेत आहेत. यंदा त्यांनी साडेतीन एकर क्षेत्रामध्ये हळद या पिकाची लागवड केली आहे. हळद शेती ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करतात. तसेच पाण्याचे ठिबक सिंचनचे नियोजन व्यवस्थापन त्यांनी केलेले आहे. या हळद शेतीतून निघणाऱ्या पिकाचे ते स्वतः हळद पावडर निर्मिती करतात आणि ते उत्पादन बाजारात देखील विक्री करतात. या शेती-व्यवसायाच्या माध्यमातून खर्च वजा करून 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा धोत्रे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली.



