जळगाव जामनेर तालुक्यातील मोराड गावातील ही एक धक्कादायक घटना आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन दिवसाच्या नवजात लहान मुलीच्या डोक्यात लाकडी पाट मारुन हत्या केली आहे. मुलगा हवा या हव्यासापोटी ही हत्या झाल्याचे समजले. या इसमाला पहिल्या तीन मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता त्यामुळे त्याने हे विकृत कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
Last Updated: Dec 26, 2025, 21:30 IST


