Bollywood Song : 'मुझसे शादी करोगे' चित्रपटातील 'लाल दुपट्टा' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होतं. चित्रपटात दोघंही नायक एकाच तरुणीवर प्रेम करत असतात. एक नायक हा रागीट स्वभावाचा असतो, तर दुसरा मस्तीखोर असतो. रागीट स्वभाव तरुणीच्या वडिलांना आवडत नसतो. तर मस्तीखोर नायक दुसऱ्याला त्रास देत असतो. शेवटी एका मॅचच्या वेळेस तरुणी तिचे कोणावर प्रेम आहे ते कबूल करते. हे गाणं अल्का याग्निक आणि उदित नारायण यांनी गायले आहे. तर गाण्याचं संगीत हे साजिद-वाजिद यांनी दिले आहे.या गाण्याचे बोल हे जलीस शेरवानी यांनी लिहिले आहे. या चित्रपटात सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.
Last Updated: Dec 16, 2025, 21:03 IST


