आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक अडचणी आणि वैयक्तिक चिंता यांमुळे माणूस सतत तणावाखाली जगतो. पण या मानसिक दडपणाचा शरीरावरही गंभीर परिणाम होतो. अनेकांना असं जाणवतं की, तणाव वाढल्यावर वजनही वाढतं. ही फक्त योगायोगाची गोष्ट नसून त्यामागं ठोस वैज्ञानिक कारणं दडलेली आहेत.



