मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मोठ्या अडचणीत सापडली आहे. मतदारांना आकर्षित करण्यसाठी भाजपकडून मोठी रणनीती आखण्यात येत आहे. त्या-त्या राज्यातील लोकांना मुंबईत प्रचारासाठी बोलवण्यात येत आहे. दरम्यान, प्रचारात भाजप नेते अण्णामलाई यांनी केलेल्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना अण्णामलाई यांनी 'बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्राज सिटी' अशा आशयाचं विधान केलं आहे. हे विधान समोर येताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 19:44 IST


