अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात यावरून अनेक शंका, संशय आणि प्रश्नांचं वादळ उठलं. आरोप प्रत्यारोप झाले. पण या सगळ्याचा उलगडा ज्या ब्लॅक बॉक्समधून होईल अशी आशा होती तो ब्लॅक बॉक्सच जळाल्याचं कळतंय. त्यामुळे उलगडा होणं सोडं नव्या प्रश्नांची भर घालत विरोधकांनी आणि अगदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रश्नांच्या फैरी उडवल्या आहेत.



