'मी रडलो, हात जोडले पण त्याने पैसे दिले नाही'; राजपाल यादवला 5 कोटी देणाऱ्या उद्योगपतीने पहिल्यांदाच सांगितले खरं काय घडलं?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Actor Rajpal Yadav Debt Case: 9 कोटींच्या कर्जप्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर अभिनेता राजपाल यादव आज तिहार तुरुंगातून बाहेर पडणार आहेत. दरम्यान 5 कोटींचे कर्ज देणारे उद्योजक माधव गोपाल अग्रवाल यांनी 14 वर्षांच्या वादाबाबत पहिल्यांदाच सविस्तर खुलासा केला आहे.
नवी दिल्ली/मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव आज तिहार कारागृहातून बाहेर आले. दिल्ली उच्च न्यायालयाने 9 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणात त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र या प्रकरणाला सुरुवात कशी झाली आणि 14 वर्षांत नेमकं काय घडलं, याबाबत कर्ज देणाऱ्या उद्योगपतीने आता प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे.
2012 च्या चित्रपटासाठी घेतलं होतं कर्ज
‘भूल भुलैया’सारख्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या राजपाल यादवने 2012 मध्ये ‘अता पता लापता’ हा चित्रपट बनवला होता. त्यासाठी एम/एस मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे उद्योगपती माधव गोपाल अग्रवाल यांनी 5 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा दावा केला आहे.
न्यूज पिंचला दिलेल्या मुलाखतीत अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांची राजपाल यादव यांच्याशी पहिली भेट खासदार मिथिलेश कुमार कठेरिया यांच्या माध्यमातून झाली. “चित्रपट जवळपास पूर्ण झाला आहे. पैसे मिळाले नाहीत तर सगळं वाया जाईल,” असं यादव यांनी सांगितल्याचं ते म्हणाले.
advertisement
मी स्वतः उधार घेऊन पैसे दिले
अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांनी कर्ज देण्यास नकार दिला होता. मात्र यादव यांच्या पत्नी राधा यांनी भावनिक संदेश पाठवून मदतीची विनंती केली. अखेर त्यांनी इतरांकडून उधार घेऊन 5 कोटी रुपये दिले. हा गुंतवणूक व्यवहार नव्हता, तर स्पष्ट कर्ज होतं. करारात नमूद होतं की चित्रपट यशस्वी किंवा अपयशी झाला तरी रकमेवर त्याचा परिणाम होणार नाही. ठरलेल्या वेळेत पैसे परत करायचेच, असा दावा अग्रवाल यांनी केला. त्यांनी वैयक्तिक हमीही दिल्याचे ते म्हणाले.
advertisement
करार, नव्या चेक्स आणि कोर्टाचा मार्ग
ठरलेल्या मुदतीत पैसे न मिळाल्याने अग्रवाल यांनी वारंवार संपर्क साधला. निधी नसल्याचं सांगत पूरक करार तीन वेळा करण्यात आले आणि नवे चेक्स देण्यात आले. चित्रपटाचं संगीत अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत लाँच झालं, तेव्हा करारानुसार निगेटिव्ह आणि रक्कम मिळायला हवी होती, असं अग्रवाल सांगतात. त्यामुळे त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.
advertisement
नंतर समझोता करून स्थगिती उठवण्यात आली, मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. 2013 मध्ये पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 10.40 कोटी रुपयांवर समझोता झाल्याचं सांगितलं जातं. मात्र जमा केलेले सर्व चेक्स बाऊन्स झाल्याने प्रकरण पुढे सरकलं.
“मला फक्त माझे पैसे परत हवेत”
अग्रवाल यांनी स्पष्ट केलं, मी व्यवसायिक आहे. मला फक्त माझी रक्कम परत हवी आहे. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणामुळे दोन्ही बाजूंमध्ये कायदेशीर संघर्ष सुरू असून, सध्या राजपाल यादव यांना अंतरिम जामीन मिळाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अग्रवाल यांनी केलेल्या या दाव्यावर अद्याप राजपाल यादव यांची प्रतिक्रिया आलेली नाहीय
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 9:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
'मी रडलो, हात जोडले पण त्याने पैसे दिले नाही'; राजपाल यादवला 5 कोटी देणाऱ्या उद्योगपतीने पहिल्यांदाच सांगितले खरं काय घडलं?








