अखेरच्या क्षणी कर्मचारी बदलले, सुनेत्रा पवारांनाही दादांच्या अपघातावर शंका, मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीकडून पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या मनातही अपघाताच्या संदर्भाने बरेच प्रश्न आहेत. राष्ट्रवादीच्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी मनातल्या शंकांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी केली.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. अजित पवारांचा अपघात की घातपात अशी चर्चा ही सुरू झाली आहे. रोहित पवारांनी तर हा अपघात नाही तर घातपात असल्याची शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी या अपघाताची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. तसे निवेदन ही देण्यात आले आहे.
advertisement
सुनेत्रा पवार यांच्या मनात कोणकोणत्या शंका?
अखेरच्या क्षणी विमानाचे कर्मचारी बदलले
एटीसीनं दिलेल्या सूचना आणि लँडिंगचा क्लिअरन्स यात विसंगती
विमानातील अत्यंत महत्त्वाच्या वॉर्निंग सिस्टीमबाबत साशंकता
लँडिंगवेळी संकटात असल्याचं कुठलंही संभाषण रेकॉर्डिंग नाही
विमान, देखभाल दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांचं फिटनेस
ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्याचवेळी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यापूर्वी अशा घटनांसाठी स्वायत्त यंत्रणा नेमलेल्या आहेत. त्या यंत्रणांनी तपास सुरू केल्याचे घोषित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्वायत्त यंत्रणा तपास करत आहेत पण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास होऊ शकतो, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते.
advertisement
ज्यावेळी स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळी बाह्य देशातील यंत्रणाही अपघाती प्रकरणाचा तपास करत असतात असे सांगतानाच या प्रकरणाचा सखोलतेने तपास व्हावा. जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत त्या सर्व मुद्द्यांचा तपास व्हावा आणि निष्कर्ष लवकरात लवकर राज्यातील नव्हे तर देशातील जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 9:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अखेरच्या क्षणी कर्मचारी बदलले, सुनेत्रा पवारांनाही दादांच्या अपघातावर शंका, मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे








