advertisement

भैया, तो मरून जाईल, मारू नका...बीडमध्ये भररस्त्यात बाप- लेकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Last Updated:

घरावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात आमच्याविरुद्ध तक्रार का दिली? असे म्हणत भररस्त्यात अडवून दोघांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18
News18
बीड : घरावर झालेल्या हल्ल्याची पोलिसांत तक्रार का दिली, असा जाब विचारत भररस्त्यात दोघा बाप-लेकांना अडवून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील पेठ बीड भागात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला असून, घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधाच गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारी रोजी सदाशिव कोकाट यांच्या घरावर दगडफेक करत, लाठ्या-काठ्यांनी सीसीटीव्ही फोडून विजयमाला कोकाट यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पेठ बीड पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आपले नाव का टाकले, असा जाब विचारत 66 वर्षीय सदाशिव कोकाट आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कोकाट यांना भररस्त्यात अडवून पाच जणांनी बेदम मारहाण केली. “तू टाकलेल्या गुन्ह्यातून माझे नाव काढून घे, नाहीतर तुला 307 मध्ये अडकवू,” अशी धमकी देत आरोपींनी अश्लील शिवीगाळ केली. दोन तरुणींसह पाच जणांनी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी, काठ्यांनी आणि हातांनी मारहाण केली.
advertisement

नेमकं काय घडलं? 

या घटनेदरम्यान, “जर कोणी मध्ये पडले तर सगळ्यांना गुंतवू,” अशी धमकी देण्यात आल्याचेही समोर आले आहे. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी “भैया, तो मरून जाईल, मारू नका,” अशी विनवणी केल्याचे दृश्य व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते. या दोन्ही हल्ल्यांमध्ये कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement

कठोर कारवाईची मागणी

या घटनेनंतर बीड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव, मारहाण, धमकी आणि शिवीगाळ अशा विविध कलमान्वये पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक न झाल्याने जखमींच्या कुटुंबीयांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नाही, तर ते आमच्यातील एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतात,  अशी भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
advertisement

बीड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

दरम्यान, या घटनेमुळे बीड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भैया, तो मरून जाईल, मारू नका...बीडमध्ये भररस्त्यात बाप- लेकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement