advertisement

Siddharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्रावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

Last Updated:

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.

Bollywood Actor Sidharth Malhotra Father Sunil Malhotra Passed Away
Bollywood Actor Sidharth Malhotra Father Sunil Malhotra Passed Away
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचं निधन झालं आहे. अभिनेत्याचे वडील सुनिल मल्होत्रा यांचं 14 फेब्रुवारी रोजी निधन झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांचं निधन नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. निधनाची बातमी कळताच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. सध्या कियारा आणि सिद्धार्थ हे दोघंही दिल्लीमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत आहेत.
सुनिल मल्होत्रा यांचं निधन दिल्लीमध्येच झाले असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुद्धा दिल्लीमध्येच करण्यात आले. या दुःखाच्या काळात सिद्धार्थ आणि कियारा दोघेही दिल्लीतील कुटुंबासोबत आहेत. दरम्यान, सिद्धार्थच्या वडिलांचे निधन नेमकं कोणत्या आजारामुळे झाले याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सिद्धार्थच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त त्याच दिवशी समोर आले नाही. तब्बल दोन ते तीन दिवसांनंतर माध्यमांमध्ये अभिनेत्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी समोर आली. 
advertisement
सिद्धार्थचे वडील कोण होते?
सुनील मल्होत्रा ह्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये माजी कॅप्टन म्हणून काम पाहिले. सिद्धार्थ वडिलांच्या खूप जवळचा व्यक्ती होता. सिद्धार्थसोबत त्याचे वडील अनेक वेळा स्पॉट झाले आहेत. त्यांनी अनेकदा सिद्धार्थच्या चित्रपटांच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. 2024 मध्ये, जेव्हा सिद्धार्थचा "योद्धा" चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा त्याच्या वडीलांनी त्याच्या अभिनयाचे फार कौतुक केले होते. त्यांनी व्हिलचेअरवरून अभिनेत्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Siddharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्रावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement