advertisement

Fridge : फ्रिजमधून विचित्र आवाज येतोय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की ट्राय करा, नक्कीच वाचतील पैसे

Last Updated:
अशा वेळी आपण घाबरून जातो आणि लगेच मेकॅनिकला फोन लावतो. पण थांबा! मेकॅनिकला हजारो रुपये देण्यापूर्वी ही ट्रीक करुन पाहा, काही छोट्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमचा फ्रिज पुन्हा 'सुपर कूल' आणि 'सायलेंट' करू शकता.
1/8
कडक उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरात सर्वात जास्त राबणारं उपकरण कोणतं असेल, तर तो म्हणजे आपला 'रेफ्रिजरेटर' म्हणजेच फ्रिज. बाहेरचा पारा 40 अंशांच्या पार गेला की आपल्याला सारखं थंड पाणी, सरबत किंवा आइस्क्रीम हवं असतं. पण, विचार करा... भर दुपारी जर तुमच्या फ्रिजने अचानक साथ सोडली किंवा त्यातून विचित्र 'घरघर' आवाज यायला लागला तर?

2/8
अशा वेळी आपण घाबरून जातो आणि लगेच मेकॅनिकला फोन लावतो. पण थांबा! मेकॅनिकला हजारो रुपये देण्यापूर्वी ही ट्रीक करुन पाहा, काही छोट्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमचा फ्रिज पुन्हा 'सुपर कूल' आणि 'सायलेंट' करू शकता.
अशा वेळी आपण घाबरून जातो आणि लगेच मेकॅनिकला फोन लावतो. पण थांबा! मेकॅनिकला हजारो रुपये देण्यापूर्वी ही ट्रीक करुन पाहा, काही छोट्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमचा फ्रिज पुन्हा 'सुपर कूल' आणि 'सायलेंट' करू शकता.
advertisement
3/8
1. तुमचा फ्रिज जमिनीवर नीट 'बॅलन्स' आहे का?अनेकदा फ्रिज ठेवताना आपण तो समतल (Level) जमिनीवर आहे की नाही याकडे दुर्लक्ष करतो. जर फ्रिज एका बाजूला झुकलेला असेल, तर त्याचा कॉम्प्रेसर चालताना जोरात कंप पावतो (Vibrate होतो), ज्यामुळे मोठा आवाज येतो.
काय कराल? फ्रिज हलकासा हलवून पहा. जर तो डगमगत असेल, तर त्याच्या पायाखाली रबरचा तुकडा, लाकडी फळी किंवा स्टँड लावून त्याला स्थिर करा. यामुळे आवाज 50% कमी होईल.
1. तुमचा फ्रिज जमिनीवर नीट 'बॅलन्स' आहे का?अनेकदा फ्रिज ठेवताना आपण तो समतल (Level) जमिनीवर आहे की नाही याकडे दुर्लक्ष करतो. जर फ्रिज एका बाजूला झुकलेला असेल, तर त्याचा कॉम्प्रेसर चालताना जोरात कंप पावतो (Vibrate होतो), ज्यामुळे मोठा आवाज येतो.काय कराल? फ्रिज हलकासा हलवून पहा. जर तो डगमगत असेल, तर त्याच्या पायाखाली रबरचा तुकडा, लाकडी फळी किंवा स्टँड लावून त्याला स्थिर करा. यामुळे आवाज 50% कमी होईल.
advertisement
4/8
2. भिंत आणि फ्रिजमध्ये 'इतके' अंतर ठेवाचजागा वाचवण्यासाठी आपण अनेकदा फ्रिज भिंतीला एकदम चिकटवून ठेवतो. हीच सर्वात मोठी चूक ठरते. भिंतीला चिकटून असल्यामुळे फ्रिजची गरम हवा बाहेर पडायला जागा मिळत नाही आणि कॉम्प्रेसरवर ताण येतो. परिणामी, आवाज वाढतो आणि कुलिंग कमी होते.
काय कराल? भिंत आणि फ्रिजमध्ये किमान 5 इंचाचे अंतर ठेवा. यामुळे वेंटिलेशन सुधारते आणि फ्रिज शांतपणे काम करतो.
2. भिंत आणि फ्रिजमध्ये 'इतके' अंतर ठेवाचजागा वाचवण्यासाठी आपण अनेकदा फ्रिज भिंतीला एकदम चिकटवून ठेवतो. हीच सर्वात मोठी चूक ठरते. भिंतीला चिकटून असल्यामुळे फ्रिजची गरम हवा बाहेर पडायला जागा मिळत नाही आणि कॉम्प्रेसरवर ताण येतो. परिणामी, आवाज वाढतो आणि कुलिंग कमी होते.काय कराल? भिंत आणि फ्रिजमध्ये किमान 5 इंचाचे अंतर ठेवा. यामुळे वेंटिलेशन सुधारते आणि फ्रिज शांतपणे काम करतो.
advertisement
5/8
3. मागील 'काळ्या जाळीची' स्वच्छताफ्रिजच्या मागे असलेली काळी जाळी म्हणजे त्याचं हृदय असतं. उन्हाळ्यात यावर धूळ लवकर जमा होते. धूळ साचल्यामुळे फ्रिजला थंडावा निर्माण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे विजेचे बिलही वाढते आणि आवाजही.
काय कराल? महिन्यातून एकदा फ्रिज बंद करून मागची जाळी कोरड्या कापडाने किंवा ब्रशने साफ करा.
3. मागील 'काळ्या जाळीची' स्वच्छताफ्रिजच्या मागे असलेली काळी जाळी म्हणजे त्याचं हृदय असतं. उन्हाळ्यात यावर धूळ लवकर जमा होते. धूळ साचल्यामुळे फ्रिजला थंडावा निर्माण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे विजेचे बिलही वाढते आणि आवाजही.काय कराल? महिन्यातून एकदा फ्रिज बंद करून मागची जाळी कोरड्या कापडाने किंवा ब्रशने साफ करा.
advertisement
6/8
4. फ्रीजरमध्ये बर्फाचा डोंगर साचलाय?जर तुमच्या फ्रीजरमध्ये बर्फाची खूप जाड थर साचली असेल, तर आतला फॅन त्या बर्फाला घासतो आणि 'खडखड' असा आवाज येतो. हे मॅन्युअल डीफ्रॉस्ट फ्रिजमध्ये जास्त घडते.
काय कराल? फ्रिज काही तासांसाठी बंद करून 'डीफ्रॉस्ट' करा. पूर्ण बर्फ वितळल्यानंतर फ्रिज पुन्हा पूर्वीसारखा गारवा देऊ लागेल.
4. फ्रीजरमध्ये बर्फाचा डोंगर साचलाय?जर तुमच्या फ्रीजरमध्ये बर्फाची खूप जाड थर साचली असेल, तर आतला फॅन त्या बर्फाला घासतो आणि 'खडखड' असा आवाज येतो. हे मॅन्युअल डीफ्रॉस्ट फ्रिजमध्ये जास्त घडते.काय कराल? फ्रिज काही तासांसाठी बंद करून 'डीफ्रॉस्ट' करा. पूर्ण बर्फ वितळल्यानंतर फ्रिज पुन्हा पूर्वीसारखा गारवा देऊ लागेल.
advertisement
7/8
5. कॉम्प्रेसरचे नट-बोल्ट तपासाखूप वर्ष वापरल्यानंतर फ्रिजच्या कॉम्प्रेसरचे बोल्ट ढीले होतात. फ्रिज चालू किंवा बंद होताना जर धातू आदळल्यासारखा मोठा आवाज येत असेल, तर समजून जा की फिटिंग ढीली झाली आहे.
काय कराल? एकदा नीट तपासून घ्या, गरज पडल्यास घरच्या घरी किंवा एखाद्या साध्या पाना-पक्कडने ते बोल्ट घट्ट करून घ्या.
5. कॉम्प्रेसरचे नट-बोल्ट तपासाखूप वर्ष वापरल्यानंतर फ्रिजच्या कॉम्प्रेसरचे बोल्ट ढीले होतात. फ्रिज चालू किंवा बंद होताना जर धातू आदळल्यासारखा मोठा आवाज येत असेल, तर समजून जा की फिटिंग ढीली झाली आहे.काय कराल? एकदा नीट तपासून घ्या, गरज पडल्यास घरच्या घरी किंवा एखाद्या साध्या पाना-पक्कडने ते बोल्ट घट्ट करून घ्या.
advertisement
8/8
या पाच गोष्टी केल्यावरही जर समस्या सुटत नसेल, तरच प्रोफेशनल मेकॅनिकला बोलवा. कारण अनेकदा समस्या मोठी नसून फक्त देखभालीची असते.
या पाच गोष्टी केल्यावरही जर समस्या सुटत नसेल, तरच प्रोफेशनल मेकॅनिकला बोलवा. कारण अनेकदा समस्या मोठी नसून फक्त देखभालीची असते.
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement