मुंबई: दादर परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलांसाठी एक आकर्षण ठरलेला टी-शर्ट, स्टॉल सध्या विशेष चर्चेत आहे. दादर वेस्ट येथील सुविधा शॉपच्या बाजूला आणि डोमिनोजच्या खाली असलेल्या या स्टॉलवर महिलांसाठी लागणारे आकर्षक प्रिंटेड टी-शर्ट अवघ्या 100 रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वाढत्या महागाईच्या काळात इतक्या कमी किमतीत फॅशनेबल कपडे मिळत असल्याने तरुणी आणि महिलांची येथे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.



