मुंबईतील धक्कादायक बातमी, धावत्या लोकल मधून तरुणीला फेकलं,VIDEO

पनवेल - सीएसएमटी लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पनवेल-सीएसएमटी प्रवासादरम्यान महिलांच्या डब्ब्यात एक 50 वर्ष वयाचा पुरुष चढला होता. तेव्हा एका 18 वर्षाच्या तरुणीने त्याला महिलांच्या डब्यातून खाली उतरण्यास सांगितलं. पण, दोघांमध्ये वाद झाला आणि या इसमाने तरुणीला धावत्या लोकलमधून खाली फेकलं. या अपघातात तरुणीच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर जखम झाली.डब्यातील महिलांनी ही माहिती पोलिसांना कळवली.त्यानंतर खांदेश्वर स्टेशनला या आरोपीला सीआरपीएफ जवानांनी पकडलं. या जखमी तरुणीचं नाव श्वेता असं आहे, तर आरोपीचं नाव शेख नवाज आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated: Dec 22, 2025, 18:33 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
मुंबईतील धक्कादायक बातमी, धावत्या लोकल मधून तरुणीला फेकलं,VIDEO
advertisement
advertisement
advertisement