मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी बंडखोरी करत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडत अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तेव्हा त्यांनी मनसे सोडण्यामागची खदखद व्यक्त केली आहे. सोबतच त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पक्षावर गंभीर आरोप केले.



