Nagpur Election News : नगरसेवक म्हणून निवडून आल्यास प्रभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णालय, ई-लायब्ररी उभारणे तसेच तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं भाजप उमेदवारांनी सांगितलं आहे. प्रभाग क्रमांक 28 मधील भाजप उमेदवार पिंटू झलके आणि किरण दातीर यांनी सकाळपासून जोरदार प्रचार रॅली काढत मतदारांशी थेट संवाद साधला. विकसित भागांसोबतच काही स्लॅम भागांचा समावेश असलेला हा प्रभाग आहे. गेल्या कार्यकाळात या प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचे होते, मात्र यंदा भाजपने दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
Last Updated: Jan 10, 2026, 19:07 IST


