पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक फैरी झडताहेत. ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच्याच सोबत मी सत्तेत बसलोय, असे सांगत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. त्यामुळे अजित पवार यांच्या आरोपांची धार पाहून भाजप नेतेही चांगलेच खवळले आहेत.रवींद्र चव्हाणांनंतर आता, घरला जायचं आहे का? असे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका, कारण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचा आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
Last Updated: Jan 04, 2026, 20:27 IST


