मावळ कार्ल्यातील एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळेंवर कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप झाला आहे. देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी हे आरोप अध्यक्षांवर केले आहेत. पुजारी म्हणाले, "दानात मिळालेल्या सोन्या चांदींच्या वस्तुंवर त्यांनी डल्ला मारला आहे. ट्रस्टला न विचारता त्यांनी फॉरच्युनर गाडी देवस्थानच्या पैशातून घेतली. ती गाडी स्वतःसाठी आणि राजकीयदृष्ट्या रोज वापरत आहेत."
Last Updated: Dec 26, 2025, 21:16 IST


