वर्धा :लग्नकार्याच्या शुभप्रसंगी गोंधळ घालण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. ज्या घरी लग्नकार्य असतं त्या घरी जागरण गोंधळ किंवा देवीचा आणि खंडोबाचा जागर हा केलाच जातो. महाराष्ट्रात लग्न कार्याच्या प्रसंगी आपापल्या सोयीनुसार दिवस ठरवून गोंधळ घातला जातो. काही ठिकाणी हळदीच्या दिवशी तर काही ठिकाणी सत्यनारायणाच्या दिवशी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. मात्र महाराष्ट्रात गोंधळाची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? आणि लग्नकार्याच्या प्रसंगी गोंधळ घालण्याचं नेमकं काय महत्त्व असतं? यासंदर्भात वर्धा येथील गोंधळी राजीव कानडे यांच्याकडून माहिती जाणून घेऊया.
Last Updated: November 25, 2025, 18:36 IST