वर्धा: विविध खेळ प्रकारांकडे आजकाल चिमुकल्यांचा कल वाढताना दिसून येतो आहे. वर्धा जिल्ह्यातही मोठ्या संख्येने मुलं आणि मुलीही कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत. सध्या पालकांनाही आपल्या मुलांना वेगवेगळ्या खेळ प्रकारांचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे अगदी 5-6 वर्षांचे चिमुकलेही कराटे प्रशिक्षण घेत आहेत. अनेक मुलं कराटेमध्ये राज्य ते राष्ट्रीय पातळीपर्यंत बक्षीस मिळवत आहेत. कराटे क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर विशेष मेहनत घेणे गरजेचे आहे. मोबाईलच्या आहारी जाऊ नये आणि सकस आहार घ्यावा, असे आवाहन वर्ध्यातील प्रशिक्षकांकडून आणि यशस्वी कराटे खेळाडूंकडून करण्यात येते. मुलींना कराटे शिकण्याचे अनेक फायदे वर्धा जिल्ह्यात कराटे शिकणाऱ्या चिमुकल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुली देखील अतिशय उत्साहाने कराटे प्रशिक्षण घेत आहेत. मुलींना स्वतःची रक्षा करण्यासाठी कराटे प्रशिक्षण उपयोगी ठरते. आज-काल सर्वच क्षेत्रांमध्ये मुलींची संख्या वाढताना दिसते आहे. इतर खेळ प्रकारांसह कराटे आणि लाठीकाठी मध्ये देखील अनेक मुलींनी राज्यस्तरीय आणि तर ही बक्षीसे मेडल्स जिंकली आहेत.
Last Updated: December 15, 2025, 17:36 IST


