वर्धा : कांस्य थाळी थेरेपी ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे. कांस्यच्या धातूने पायांना मसाज केला जातो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते असे सांगितले जाते. कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्तमिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या कांस्य या धातूपासून कांस्याची वाटी बनवली जाते. शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी कांस्याची वाटी प्रभावी ठरते. जुन्या काळापासून ही एक उपचारपद्धती प्रभावी मानली गेली आहे. आज या थेरेपीचं स्वरूप मशीनमध्ये बघायला मिळत आहे. ही थेरेपी नेमकी कशी दिली जाते? या थेरेपीचे शरीराला काय फायदे आहेत? यासंदर्भात वर्धा येथील कांस्य थाळी थेरेपिस्ट अभिषेक मांजरखेडे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 23, 2025, 18:51 IST