पृथ्वीच्या दिशेने येतोय धूमकेतू, 1 चुकीचा कोन अन् विनाश; वैज्ञानिकही चिंतेत, नासा अलर्टवर

Last Updated:

Science News: 31/ATLAS हा दुर्मिळ धूमकेतू NASA आणि International Asteroid Warning Networkच्या Comet Campaign मोहिमेत पृथ्वीच्या सुरक्षेसाठी संभाव्य इशारा प्रणाली ठरू शकतो.

News18
News18
न्यूयॉर्क: जर आपण असं म्हणालो की आता पृथ्वीचं भवितव्य एका रहस्यमय धूमकेतूच्या खांद्यावर टिकलेलं आहे, तर ते काही अतिशयोक्ती ठरणार नाही. या धूमकेतूचं नाव आहे ३१/ATLAS, ज्याबद्दल काही लोकांचा असा विश्वास होता की तो एलियन टेक्नॉलॉजीचा एक नमुना असू शकतो. मात्र वैज्ञानिकांच्या मते हा धूमकेतू परग्रहवासीयांचा नाही, तर तो अवकाशातील एक अत्यंत दुर्मिळ आणि अनोखा प्रवासी आहे आणि तो पृथ्वीला धोका नसून उलट भविष्यात पृथ्वीच्या सुरक्षेसाठी एक “इशारा प्रणाली” उभारण्यात मदत करू शकतो. म्हणजेच हा धूमकेतू आपल्या ग्रहाचा शत्रू नव्हे तर संभाव्य रक्षक ठरू शकतो.
advertisement
नासाच्या नेतृत्वाखाली जागतिक मोहीम
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार नासाच्या नेतृत्वाखाली जगभरातील वैज्ञानिकांची एक मोठी टीम या धूमकेतूवर बारीक नजर ठेवणार आहे. २७ नोव्हेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेला ‘कॉमेट कॅम्पेन’ (Comet Campaign) असं नाव देण्यात आलं आहे.
advertisement
या आंतरराष्ट्रीय मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे अशा धूमकेतूंच्या हालचाली पृथ्वीच्या किती जवळून होतात, हे समजून घेणे आणि भविष्यात त्यांचा वेळीच शोध घेण्यासाठी तंत्र विकसित करणे. वैज्ञानिक या मोहिमेत हेही तपासतील की अशा धूमकेतूंमुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो का? की ते खरोखरच अंतराळातील नैसर्गिक चेतावणी प्रणाली बनू शकतात.
advertisement
पृथ्वीचा रक्षक की भक्षक?
हा मिशन इंटरनॅशनल अ‍ॅस्टरॉईड वॉर्निंग नेटवर्क (International Asteroid Warning Network) च्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. जगभरातील अंतराळ संशोधक या मोहिमेदरम्यान शिकतील की धूमकेतूंची गती, दिशा आणि आकार किती अचूकपणे मोजता येऊ शकतात. या मोजमापांमुळे भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्कापिंडांचा वेळीच अंदाज बांधता येईल.
advertisement
वैज्ञानिक सांगतात की धूमकेतूंचे निरीक्षण करणे अत्यंत कठीण असते कारण त्यांच्या मागे लांब टेल (Tail) आणि गॅस व धुळीचा कोमा (Coma) असतो. ज्यामुळे त्यांच्या खऱ्या चमकदार स्वरूपाचा आणि अचूक स्थानाचा अंदाज घेणे कठीण होते. त्यामुळे अनेकदा धूमकेतू पृथ्वीपासून किती अंतरावरून जाणार आहे, हे ठामपणे सांगणे अवघड ठरते. सध्या मात्र ATLAS धूमकेतूचा मार्ग पृथ्वीपासून सुरक्षित अंतरावरून जात आहे, असे नासाचे म्हणणे आहे.
advertisement
कॉस्मिक प्रोटेक्शन शील्ड’कडे मोठं पाऊल
या धूमकेतूचं पृथ्वीपासूनचं अंतर सुमारे १.८ सौर-धरती अंतराएवढं (Astronomical Unit) आहे. त्यामुळे तो पृथ्वीवरून दुर्बिणीच्या साहाय्याने पाहता येऊ शकतो.
हावर्ड विद्यापीठाचे खगोलभौतिकतज्ज्ञ डॉ. एव्ही लोएब (Dr. Avi Loeb) हे या धूमकेतूचा सुरुवातीपासून अभ्यास करत आहेत. त्यांच्यानुसार हा आपल्या सौरमालेत येणारा तिसरा इंटरस्टेलर ऑब्जेक्ट (Interstellar Object) आहे. म्हणजे आपल्या सौरमालेबाहेरून आलेला पाहुणा. डॉ. लोएब यांच्या मते, ATLAS च्या नॉन-ग्रॅविटेशनल एक्सेलेरेशनमुळे (गुरुत्वाकर्षणाशिवाय होणारी गती) तो बृहस्पति, शुक्र आणि मंगळाच्या जवळून जात आहे.
advertisement
जर वैज्ञानिकांनी या धूमकेतूच्या हालचाली अचूकरीत्या ट्रॅक करण्यात यश मिळवलं, तर ही मोहीम येत्या काही दशकांपर्यंत पृथ्वीच्या सुरक्षेसाठी एक ‘कॉस्मिक प्रोटेक्शन शील्ड’ तयार करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल ठरेल.
एकंदरीत पाहता ३१/ATLAS हा केवळ एक धूमकेतू नसून तो मानवजातीला भविष्यातील आकाशातील संकटांची वेळेवर जाणीव करून देणारा ‘कॉस्मिक फ्रेंड’ ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
पृथ्वीच्या दिशेने येतोय धूमकेतू, 1 चुकीचा कोन अन् विनाश; वैज्ञानिकही चिंतेत, नासा अलर्टवर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement