पुन्हा तसंच घडलं! अहमदाबाद विमान दुर्घटनेची पुनरावृत्ती, शाळेवर कोसळलं विमान, पाहा LIVE VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अहमदाबादनंतर ढाकामध्ये बांग्लादेशचं ट्रेनिंग विमान शाळेवर कोसळलं. स्फोटामुळे आगीचे लोळ उडाले. अनेक मुलं आणि नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटना ताजी असताना ज्याची भीती होती पुन्हा तेच घडलं आहे. विमान दुर्घटनेच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. अहमदाबाद इथे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं होतं. आता पुन्हा एकदा शाळेवर विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. विमान कोसळताच स्फोट झाला आणि आगीचे लोळ उडाले. दूरवर आगीचे आणि धुराचे लोळ दिसत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
शाळेत आणि आजूबाजूला भीतीचं वातावरण पसरलं आहे. विमान कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अनेक मुलं आणि नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना तातडीनं उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती पोलिसांना आणि आपत्कालीन विभागाला कळवण्यात आली असून शाळेतील मुलांचं बचावकार्य सुरू आहे.
Exclusive
A f-7 trainer aircraft of Bangladesh Air Force has been reportedly crashed over Milestone College in capital Dhaka.
Many wounded students and civilians are being admitted into several hospitals.@Iyervval @Chellaney @Sanjay_Dixit @ANI @NIA_India @ShivAroor pic.twitter.com/t8BmZ1hL1y
— BANGLADESH CRISIS 🇧🇩 (@BDcrisis) July 21, 2025
advertisement
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बांग्लादेशचं AF ट्रेनिंग करणारं विमान शाळेवर कोसळून मोठी दुर्घटना घडली. ढाकामध्ये कॉलेज परिसरात फायटर विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे विमान चायना मॉडेल असल्याची माहिती देखील मिळाली आहे. दुपारी 1 वाजून 6 मिनिटांनी ही भीषण दुर्घटना घडली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 21, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पुन्हा तसंच घडलं! अहमदाबाद विमान दुर्घटनेची पुनरावृत्ती, शाळेवर कोसळलं विमान, पाहा LIVE VIDEO


