इस्लामाबादवर अफगाणिस्तानचा Air Strikes, पाकिस्तानच्या राजधानीवर तालिबानचा मोठा पलटवार;महत्त्वाच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Afghanistan Air Strikes: अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या इस्लामाबादसह अनेक शहरांवर भीषण हवाई आणि ड्रोन हल्ले चढवून मोठा लष्करी पलटवार केला आहे. या कारवाईत 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून अफगाण सैन्याने अनेक लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला आहे.
इस्लामाबाद/काबुल: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता युद्धाच्या पातळीवर पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री काबुल, कंधार आणि पक्तिया भागात पाकिस्तानने केलेल्या कथित हवाई घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून अफगाण हवाई दलाने आज सकाळी पाकिस्तानच्या राजधानीवर म्हणजेच इस्लामाबादवर जोरदार हवाई हल्ले (Air Strikes) केले आहेत.
इस्लामाबादसह अनेक शहरांना लक्ष्य केले
आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अफगाण हवाई दलाने इस्लामाबादमधील फैजाबादजवळ असलेल्या लष्करी तळाला लक्ष्य केले. याव्यतिरिक्त खैबर पख्तूनख्वामधील नौशेरा येथील आर्मी बॅरेक, जमरूद येथील लष्करी वसाहत आणि एबटाबादमधील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर अफगाण वायूसेनेने अचूक हल्ले केले आहेत. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, हे ऑपरेशन पाकिस्तानच्या कमांड सेंटर्स आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना नष्ट करण्यासाठी राबवण्यात आले होते.
advertisement
ड्रोन हल्ल्यांनी पाकिस्तान हादरले
या हवाई हल्ल्यांसोबतच अफगाण सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर स्वदेशी बनावटीच्या ड्रोनद्वारेही हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे अनेक लष्करी तळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, हे ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा अफगाण संरक्षण मंत्रालयाने केला आहे. पाकिस्तान सरकारकडून अद्याप या हल्ल्यांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
advertisement
55 पाकिस्तानी सैनिक ठार, लष्करी चौक्यांवर ताबा
अफगाणिस्तानमधील 'टोलो न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार या भीषण संघर्षात पाकिस्तानचे 55 सैनिक मारले गेले आहेत. अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या दोन प्रमुख मुख्यालयांसह 19 लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला आहे. या कारवाईदरम्यान अफगाण सैन्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला असून, काही पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडल्याचेही वृत्त आहे. या संघर्षात अफगाणिस्तानचेही 8 सैनिक शहीद झाले असून, 11 जण जखमी झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 3:23 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
इस्लामाबादवर अफगाणिस्तानचा Air Strikes, पाकिस्तानच्या राजधानीवर तालिबानचा मोठा पलटवार;महत्त्वाच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले









