advertisement

Car Tips: कारसाठी कोणतेही मॉडिफिशन एकवेळेस चालतील पण हे 4 नकोच; याने अपघाताची शक्यता होते दुप्पट

Last Updated:

सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून किंवा मित्रांच्या नादाला लागून आपण गाडीला 'स्पोर्टी' लूक तर देतो, पण तुम्हाला माहिती आहे का? तुमचे हेच हौसेचे बदल अपघाताच्या वेळी तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपली कार फक्त प्रवासाचं साधन नसते, तर ती अनेकांसाठी अभिमानाची गोष्ट असते. रस्त्यावरून गाडी चालवताना ती उठून दिसावी, लोकांनी वळून पाहावं, यासाठी अनेक तरुण आपल्या कारमध्ये विविध बदल म्हणजेच 'मॉडिफिकेशन्स' करतात. कोणाला मोठे टायर आवडतात, तर कोणाला गाडीला समोरून लोखंडी गार्ड लावायला आवडतं. तर कोणी एक्ट्रा लाईट गाडीला लावतं.
सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून किंवा मित्रांच्या नादाला लागून आपण गाडीला 'स्पोर्टी' लूक तर देतो, पण तुम्हाला माहिती आहे का? तुमचे हेच हौसेचे बदल अपघाताच्या वेळी तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. गाडी कंपनीने बनवताना ती प्रत्येक सुरक्षेच्या निकषावर विचार करुन ती तयार केलेली असतात. त्यामुळे त्यात न बदल केलेलंच चांगलं, पण तरी तुम्हाला बदल करायचेच असेल तरी हे चार बदल करणं गाडीत टाळा ज्यामुळे जीवाशी खेळ होऊ शकतो.
advertisement
अवाढव्य टायर आणि व्हील्स (Oversized Tires)
गाडीला 'मॅचो' लूक देण्यासाठी अनेक जण कंपनीने दिलेल्या साईजपेक्षा खूप मोठे अलॉय व्हील्स आणि रुंद टायर बसवतात.
मोठे टायर दिसायला चांगले असले तरी ते गाडीच्या ब्रेकिंग सिस्टमवर परिणाम करतात. अचानक ब्रेक दाबण्याची वेळ आली, तर हे टायर जमिनीवर हवी तशी पकड (Grip) घेऊ शकत नाहीत. यामुळे गाडी घसरण्याचा आणि उलटण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. केवळ लूकसाठी गाडीचं नियंत्रण धोक्यात घालणं कितपत योग्य आहे?
advertisement
बंपर गार्ड किंवा 'बुल बार' (Bull Bars)
अनेकदा लोक गाडीला समोरून आणि पाठीमागून लोखंडी किंवा स्टीलचे मोठे गार्ड्स लावतात. गाडीला खरचटण्यापासून वाचवण्यासाठी हे लावले जातात, पण हे तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूचे काम करतात.
गाडीच्या एअरबॅग्स एका विशिष्ट सेन्सरवर काम करतात. जेव्हा जोरदार धडक बसते, तेव्हा हे सेन्सर एअरबॅग उघडतात. मात्र, लोखंडी गार्डमुळे धडकेचा जोर सेन्सरपर्यंत वेळेत पोहोचत नाही. परिणामी, एअरबॅग उघडायला उशीर होतो किंवा त्या उघडतच नाहीत. अशा वेळी छोटीशी धडकही जीवघेणी ठरू शकते.
advertisement
भडक हेडलाईट्स आणि टिंटेड टेललाईट्स
रात्रीच्या वेळी रस्ता स्पष्ट दिसावा म्हणून काही लोक अत्यंत तीव्र (High Intensity) किंवा निळ्या-लाल रंगाचे दिवे बसवतात. तसेच स्टाईल म्हणून मागचे दिवे (Tail lights) काळे किंवा डार्क करतात.
समोरून येणाऱ्या चालकाच्या डोळ्यावर तुमचे प्रखर दिवे पडले की, त्याला काही सेकंदांसाठी अंधारी येते (Blind spot). अशात समोरची गाडी तुमच्यावर धडकण्याची शक्यता असते. तसेच मागचे दिवे डार्क केल्यामुळे तुम्ही ब्रेक मारलाय की नाही, हे मागच्या चालकाला समजत नाही आणि मागून धडक बसण्याचा धोका वाढतो.
advertisement
खिडक्यांवर डार्क फिल्म (Black Tinted Windows)
प्रायव्हसी आणि उन्हापासून वाचण्यासाठी खिडक्यांच्या काचा काळ्या करणं खूप लोकप्रिय आहे.
रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात आणि धुक्यात या काळ्या फिल्म्समुळे चालकाची दृष्टी (Visibility) कमी होते. रस्त्यावरून चालणारे पादचारी, सायकलस्वार किंवा लहान मुले काळ्या काचेतून वेळेत दिसत नाहीत. केवळ काही सेकंदांचा हा दृष्टीभ्रम भीषण अपघाताला निमंत्रण देऊ शकतो.
advertisement
कार मॉडिफिकेशन करणे चुकीचे नाही, पण ते करताना सुरक्षेच्या मानकांशी तडजोड करू नका. लक्षात ठेवा, तुमची स्टाईल तुमच्या आणि दुसऱ्याच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही. गाडी मॉडिफाय करण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आरटीओ (RTO) नियमांचे पालन करा.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Car Tips: कारसाठी कोणतेही मॉडिफिशन एकवेळेस चालतील पण हे 4 नकोच; याने अपघाताची शक्यता होते दुप्पट
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement