ओवैसींनी पाकिस्तान विरोधात 'फिल्डिंग' लावली, मुस्लिम देशाला मैदानात उतरवले; सौदी अरबमध्ये ठरला डिप्लोमॅटिक...

Last Updated:

India Pakistan News: भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानविरोधात कूटनीतीचा नवा डाव टाकला आहे. सौदी अरेबियामध्ये भारतीय सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाने थेट पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश करत निर्णायक भूमिका मांडली.

News18
News18
रियाध : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून उघड पाडण्याचे भारताचे अभियान सातत्याने सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून एका भारतीय सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाने नुकताच सौदी अरेबियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जगासमोर आणण्यासोबतच, 'ऑपरेशन सिंदूर'ची आवश्यकता देखील सौदी नेतृत्वाला स्पष्ट केली.
भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील या प्रतिनिधी मंडळात एआयएमएम (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश होता. या शिष्टमंडळाने सौदीचे राज्यमंत्री आणि कॅबिनेट सदस्य अदेल बिन अहमद अल-जुबेर यांची भेट घेतली. चर्चेदरम्यान प्रतिनिधी मंडळाने पाकिस्तानला पुन्हा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी सौदी अरेबियाच्या समर्थनाची मागणी केली.
advertisement
FATF म्हणजे काय?
FATF (Financial Action Task Force) ही एक आंतर-सरकारी संस्था आहे. जी 1989 मध्ये पॅरिस येथे G7 शिखर परिषदेदरम्यान स्थापन करण्यात आली होती. FATF मध्ये सध्या 37 सदस्य क्षेत्र आणि दोन प्रादेशिक संस्था (युरोपीय आयोग आणि आखाती सहकार्य परिषद) यांचा समावेश आहे. या संस्था जगातील सर्व भागांतील सर्वात प्रमुख वित्तीय केंद्रांचे प्रतिनिधित्व करतात. ज्या देशांना दहशतवादाला अर्थपुरवठा (Terror Funding) आणि मनी लॉन्ड्रिंगला पाठिंबा देण्यासाठी सुरक्षित ठिकाण मानले जाते. त्यांना FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकले जाते. या यादीत देशांना समाविष्ट करण्यासाठी किंवा काढण्यासाठी FATF नियमितपणे त्यात सुधारणा करते.
advertisement
'फिल्डिंग' 
भारतीय प्रतिनिधी मंडळाने सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले की, पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांना आश्रय देत नाही. तर भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी ड्रोनद्वारे शस्त्रे आणि अंमली पदार्थ देखील पाठवत आहे. दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये भारत-सौदी सहकार्यावरही या चर्चेत भर देण्यात आला. त्यांनी आठवण करून दिली की एप्रिल 2025 मध्ये भारतात आलेल्या सौदी प्रतिनिधी मंडळासोबत झालेल्या संयुक्त निवेदनातही दहशतवादाविरुद्धच्या सहकार्याला महत्त्व देण्यात आले होते.
advertisement
फतव्याचा उल्लेख
प्रतिनिधी मंडळाने सौदी अरेबियाच्या सीनियर उलेमा कौन्सिलने जारी केलेल्या फतव्याचेही कौतुक केले. या फतव्यात दहशतवाद हा इस्लामिक कायद्याच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे. तसेच दहशतवादाच्या कोणत्याही प्रकारच्या अर्थपुरवठ्याला 'हराम' आणि दंडनीय गुन्हा ठरवण्यात आले आहे. हे भारताच्या त्या भूमिकेला पाठिंबा देते की, कोणताही धर्म निरपराध नागरिकांवरील हिंसाचाराचे समर्थन करू शकत नाही.
advertisement
2008 मुंबई हल्ला आणि साजिद मीर
या भेटीदरम्यान प्रतिनिधी मंडळाने सौदी सरकारला आठवण करून दिली की, 2008 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अबू जुंदालला भारताच्या ताब्यात देऊन त्यांनी दहशतवादाविरुद्धची आपली वचनबद्धता दर्शवली होती. यासोबतच पाकिस्तानने साजिद मीर मारला गेल्याचा खोटा दावा Asaduddin Owaisi केला होता. तर तो जिवंत आढळला, याचाही उल्लेख करण्यात आला.
advertisement
पाकिस्तानशी कोणतीही चर्चा नाही
जेव्हा सौदी बाजूने भारताला पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. तेव्हा भारतीय प्रतिनिधी मंडळाने स्पष्ट केले की- दहशतवादावर ठोस कारवाई होईपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा शक्य नाही. भारताने जेव्हा जेव्हा पाकिस्तानशी चर्चा केली, तेव्हा त्याला नकारात्मक प्रतिसादच मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रतिनिधी मंडळाने रियाधस्थित आंतरराष्ट्रीय इस्लामिक लष्करी दहशतवादविरोधी युतीचा (IMCTC) देखील उल्लेख केला आणि सौदी अरेबियाने पाकिस्तानला दहशतवादाचा स्पष्टपणे इन्कार करण्याची विनंती करावी, अशी सूचना केली.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
ओवैसींनी पाकिस्तान विरोधात 'फिल्डिंग' लावली, मुस्लिम देशाला मैदानात उतरवले; सौदी अरबमध्ये ठरला डिप्लोमॅटिक...
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement