खवळलेल्या समुद्रात 154 प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली, 68 जणांचा मृत्यू 74 लोकांचं काय झालं?

Last Updated:

3 ऑगस्टला 154 प्रवाशांनी भरलेली बोट अदनच्या आखातात बुडाली. 68 प्रवाशांचा मृत्यू झाला, 74 अजूनही बेपत्ता आहेत. सर्व प्रवासी इथियोपियाचे होते, रोजगाराच्या शोधात सौदी अरेबियाला निघाले होते.

News18
News18
Boat Accident : 154 प्रवाशांना घेऊन निघालेली बोट अचानक बुडाली. याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य मदतीला पोहोचलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. 68 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला. तर काही प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. त्यासाठी शोधकार्य सुरू आहे. 3 ऑगस्टला ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. अजूनही काही लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीतील सर्व स्थलांतरित इथियोपियाचे होते. ते यमनमार्गे सौदी अरेबियामध्ये रोजगाराच्या शोधात निघाले होते. रविवारी पहाटे अदनच्या आखातात ही बोट उलटली. या भीषण अपघातानंतर आतापर्यंत केवळ 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे, ज्यात नऊ इथियोपियन आणि एक यमनी नागरिक यांचा समावेश आहे.
आफ्रिकेतील लोक यमनसारख्या युद्धग्रस्त देशाचा मार्ग का निवडतात, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात आहे. याचे उत्तर केवळ आर्थिकच नाही, तर सामाजिक आणि राजकीयही आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी यामुळे इथियोपिया आणि सोमालियासारख्या देशांमध्ये असलेले लोक आपला जीव धोक्यात घालून समुद्रामार्गे प्रवास करुन रोजगाराच्या शोधात येतात. आखाती देशांपर्यंत पोहोचण्यासाठी सागरी मार्गाचा वापर केला जातो. तिथे चांगल्या संधी मिळतात असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (IOM) माहितीनुसार, 2024 मध्ये आतापर्यंत 60,000 हून अधिक स्थलांतरितांनी यमनमार्गे प्रवास केला आहे, तर 2023 मध्ये ही संख्या 97,200 होती. सागरी मार्गांवर सुरक्षा गस्तीत वाढ झाल्यामुळे या संख्येत घट दिसून येत आहे. सागरी मार्गे प्रवास करणं धोकादायक असलं तरीसुद्धा नोकरीसाठी हे लोक आपला जीव धोक्यात घालत आहे.
advertisement
सागरी मार्गाने नोकरीच्या शोधात जात असताना 154 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली आहे. त्यापैकी 74 लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र या घटनेनंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
खवळलेल्या समुद्रात 154 प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली, 68 जणांचा मृत्यू 74 लोकांचं काय झालं?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement