अमेरिकेत दहशतवादी हल्ला? आधी बॉम्बस्फोट झाला, मग ब्रुकलीन ब्रिजला धडकलं जहाज

Last Updated:

Brooklyn Bridge Ship Collision: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्स येथील एका फर्टिलिटी क्लिनिकच्या बाहेर कारमध्ये स्फोट झाला आहे.

News18
News18
दिल्ली: शनिवारी १७ मे रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्स येथील एका फर्टिलिटी क्लिनिकच्या बाहेर कारमध्ये स्फोट झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर अन्य ४ जण जखमी झाले. या घटनेला दहशतवादी घटनेशी जोडले जात आहे. हा एक मोठा दहशतवादी हल्ला असू शकतो, असं मानलं जात आहे. याशिवाय २०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवासी जहाजही ब्रुकलिन ब्रिजवर आदळलं आहे. या दोन्ही घटना आता दहशतवादी कटाचा भाग म्हणून पाहिल्या जात आहेत.
लॉस एंजेलिस फील्ड ऑफिसचे प्रभारी आणि एफबीआयचे सहाय्यक संचालक अकिल डेव्हिस म्हणाले की, ही घटना दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये आतापर्यंत घडलेल्या सर्वात मोठ्या बॉम्बस्फोटांपैकी एक आहे. अशाप्रकारे दहशतवादी स्फोट घडवण्याची चूक दहशतवाद्यांनी करू नये. हे जाणूनबुजून केलेलं दहशतवादी कृत्य आहे. या स्फोटामागं कोण आहे, याची अधिकृत माहिती डेव्हिस यांनी दिली नाही. मात्र 'बीएनओ न्यूज' ने संशयिताची ओळख उघड केली आहे. एडवर्ड बार्टकस असं स्फोट घडवून आणणाऱ्या २५ वर्षीय युवकाचं नाव असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
ब्रुकलिन ब्रिजला प्रवासी जहाजाची टक्कर
या स्फोटाच्या घटनेनंतर काही तासांतच आणखी एक संशयास्पद घटना घडली. यात २७७ प्रवाशांना घेऊन जाणारे कुआउटेमोक नावाचे मेक्सिकन नौदलाचे प्रशिक्षण जहाज न्यू यॉर्क शहरातील ब्रुकलिन ब्रिजवर आदळले. ज्यामध्ये किमान १९ लोक जखमी झाले. या दोन्ही घटनांमुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे. अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज १४२ वर्षे जुना आहे. या अपघातात पुलाचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. दरम्यान, अपघाताची चौकशी सुरू आहे. ब्रुकलिन ब्रिज १८८३ मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल अंदाजे १,६०० फूट लांबीचा आहे. दोन दगडी बुरुजांवर उभा आहे. या पुलावरून दररोज लाखो वाहने जातात. मेक्सिकन नौदलाच्या म्हणण्यानुसार, या अपघातात जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि जखमींवर उपचार सुरू आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेत दहशतवादी हल्ला? आधी बॉम्बस्फोट झाला, मग ब्रुकलीन ब्रिजला धडकलं जहाज
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement