चीनचा ऐतिहासिक निर्णय, पाकिस्तानचा केला 'डबल गेम'; भूमिका बदलल्याने 'आयर्न ब्रदरहुड' मध्ये फूट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
China Role Changes: भारतासोबत व्यापार, सीमेवर शांतता, 'ग्लोबल साउथ' नेतृत्व, 'बेल्ट अँड रोड' सुरक्षा, संघर्ष टाळणे, भारत-अमेरिका जवळीक यामुळे चीन पाकिस्तानला उघडपणे समर्थन देत नाही.
इस्लामाबाद: अनेक वर्षांपासून चीन आणि पाकिस्तानची मैत्री आयर्न ब्रदरहुड म्हणून ओळखली जात होती, पण आता या घट्ट नात्यात हलक्या भेगा पडताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे चीनच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यावेळी चीनने ना पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला, ना भारतावर थेट टीका केली.
विशेषज्ञांच्या मते चीनचे हे बदललेले धोरण योगायोग नाही. यामागे अनेक धोरणात्मक कारणे आहेत. चीन आता पाकिस्तानच्या पाठीशी पूर्णपणे उभे का राहत नाही, याची प्रमुख कारणे...
1. भारतासोबत मोठा व्यापार:
भारत आणि चीन यांच्यात दरवर्षी 140 अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्यापार होतो. जर चीनने भारतासोबतचा संघर्ष वाढवला तर त्याच्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होईल. चीनला माहित आहे की भारत त्याचा एक मोठा व्यापारी भागीदार आहे. ज्याला तो गमावू इच्छित नाही.
advertisement
2. सीमेवर शांतता राखणे:
2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जर चीनने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना समर्थन दिले. तर त्यामुळे भारतासोबत पुन्हा संघर्ष वाढू शकतो आणि सीमेवरील शांतता भंग होऊ शकते.
3. 'ग्लोबल साउथ'मध्ये नेतृत्वाची आकांक्षा:
चीन स्वतःला विकसनशील देशांचा नेता म्हणून सादर करू इच्छितो. तो शांतता आणि स्थिरतेबद्दल बोलतो. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या दहशतवादाला समर्थन देणे चीनच्या जागतिक प्रतिमेला हानी पोहोचवू शकते.
advertisement
4. 'बेल्ट अँड रोड' प्रकल्पाची सुरक्षा:
चीनने पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. जसे की चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (CPEC). पाकिस्तानमधील दहशतवाद आधीच या प्रकल्पांसाठी धोकादायक आहे. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर चीनची ही प्रचंड गुंतवणूक वाया जाऊ शकते.
advertisement
5. थेट संघर्षाऐवजी चतुराईने कार्य:
चीनचे धोरण आहे की तो थेट संघर्षापासून दूर राहतो आणि अप्रत्यक्षपणे दबाव निर्माण करतो. तो पाकिस्तानला शस्त्रे विकतो, संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) समर्थन देतो, परंतु भारताला उघड आव्हान देत नाही. यामुळे तो भारतासोबतच्या थेट संघर्षापासून वाचतो.
6. 'दुहेरी रणनीती'चा वापर:
चीन एका बाजूला जगात दहशतवादाचा विरोध करतो परंतु दुसरीकडे तो पाकिस्तानी दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्यापासून रोखतो. यामुळे तो जगाला दाखवतो की त्याला शांतता हवी आहे आणि पाकिस्तानचाही विश्वास संपादन करतो.
advertisement
७. भारत-अमेरिकेची वाढती जवळीक:
view commentsभारत आणि अमेरिकेमधील धोरणात्मक भागीदारी वाढत आहे. जसे की QUAD सारखे उपक्रम. चीनला भीती आहे की जर त्याने पाकिस्तानला उघडपणे समर्थन दिले. तर भारत आणखी अमेरिकेशी जवळीक साधेल. यामुळे आशियामध्ये चीनची ताकद कमी होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 24, 2025 8:47 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
चीनचा ऐतिहासिक निर्णय, पाकिस्तानचा केला 'डबल गेम'; भूमिका बदलल्याने 'आयर्न ब्रदरहुड' मध्ये फूट


