पाकिस्तानविरुद्ध आता 'इस्रायल मॉडेल', आता बॉर्डरवर होणार नवा... ; मुस्लिम देशांनी घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Pakistan News: पाकिस्तानच्या सीमेवर एका मुस्लिम देशाकडून इस्रायलच्या धर्तीवर एक अभेद्य भिंत उभारली जात आहे. ज्यामुळे पाकिस्तानची दमछाक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News18
News18
इस्लामाबाद: पाकिस्तान सध्या चोहोबाजूंनी संकटात सापडला असून त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसत नाहीये. प्रत्येक शेजारी देशासोबतचा त्याचा संघर्ष वाढत चालला असून प्रत्येक जण त्याला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. भारतासोबतचा सिंधू पाणीवाटप कराराचा वाद जुना असला तरी आता तो इतका चिघळला आहे की युद्धापर्यंतची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच एकेकाळी पाकिस्तानचे मित्र असलेले अफगाण तालिबान आता त्याच्याच नाकीनऊ आणण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने आपल्या नद्यांचे पाणी अडवण्याची धमकी दिली आहे. जेणेकरून पाकिस्तान पाण्यावाचून तळमळेल. यावर कडी म्हणजे इराणही आता पाकिस्तानला कंटाळला आहे. दहशतवादी आणि तस्करांना रोखण्यासाठी इराणने आपल्या सीमेवर चार मीटर उंच भिंत बांधायला सुरुवात केली आहे.
भारतासोबतचा पाणीप्रश्न अधिक गंभीर
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव वाढला. भारताने सिंधू पाणीवाटप करार निलंबित केला आहे. भारत आपल्या वाट्याच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करत आहे. यामुळे पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. याच कारणामुळे पाकिस्तान पाण्यावरून भारताला धमकी देत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातील दहशतवादी आणि लष्कराचे जनरल एकाच भाषेत भारताला धमकी देऊ लागले आहेत.
advertisement
तालिबानची नवी धमकी
पाकिस्तानला अजून भारताशी कसे निपटावे हे कळेपर्यंत आता अफगाण तालिबाननेही त्याची झोप उडवली आहे. बलोच कार्यकर्ते मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर दावा केला आहे की, तालिबान आता कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी करत आहे. ही नदी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात येते आणि तेथील शेतीसाठी ती जीवनवाहिनी आहे.
advertisement
असा Scam अख्या जगात...; अस्तित्वात नसलेली बाई 28 वेळा 'मेली', 11 कोटींचा घोटाळा
तालिबानचे एक वरिष्ठ जनरल मुबीन यांनी कुनार भागातील संभाव्य धरण स्थळाला भेट दिली आणि म्हटले- हे पाणी आमचे रक्त आहे. ते पाकिस्तानात वाहू देणार नाही. आम्ही यातून स्वतःची वीज तयार करू आणि शेती मजबूत करू. जर तालिबानने खरोखरच धरण बांधले, तर पाकिस्तानच्या शेतीला मोठे नुकसान होईल. अद्याप तालिबान सरकारने किंवा पाकिस्तानने या दाव्यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. परंतु ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.
advertisement
सीमेवर भिंत बांधण्याचे काम सुरू
पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर इराणनेही त्याला आरसा दाखवायला सुरुवात केली आहे. इराणने आपल्या पूर्व सीमेवर 300 किलोमीटर लांब आणि चार मीटर उंच भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. याचा उद्देश दहशतवाद, अंमली पदार्थ तस्करी आणि बेकायदेशीर घुसखोरी रोखणे हा आहे. इराणचे म्हणणे आहे की- त्यांच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणारे दहशतवादी आहेत. गेल्या वर्षी केरमान आणि सिस्तान-बलुचिस्तानमध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनंतर इराणने ही भिंत बांधण्याचा निर्णय घेतला. इराणच्या सुरक्षा यंत्रणांनुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमांवरून 80% अंमली पदार्थ तस्करी होते.
advertisement
जानेवारी 2024 मध्ये तर इराणने पाकिस्तानमध्ये जैश अल-अदल नावाच्या दहशतवादी गटावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला होता. पाकिस्तानने याला बेकायदेशीर म्हटले होते आणि गंभीर परिणामांचा इशारा दिला होता.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानविरुद्ध आता 'इस्रायल मॉडेल', आता बॉर्डरवर होणार नवा... ; मुस्लिम देशांनी घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement