General Knowledge: भारताच्या या शेजारी देशात एकही नदी नाही; तर दुसऱ्या शेजारी देशात 700 नद्या

Last Updated:

Which Country Has No River: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असेही काही देश आहेत जिथे एकही नैसर्गिक नदी नाही. या देशांना पाण्याची मोठी आव्हाने पेलावी लागतात आणि त्यांच्या जगण्यासाठी ते वेगवेगळ्या पर्यायी स्रोतांवर अवलंबून असतात.

News18
News18
नवी दिल्ली: पाणी हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि नद्या ऐतिहासिकदृष्ट्या संस्कृतींची जीवनरेखा राहिल्या आहेत. नद्या सर्व गरजांसाठी पाणी पुरवतात. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात असेही काही देश आहेत जिथे एकही नैसर्गिक नदी नाही. असे देश सहसा पाण्यासाठी पर्यायी स्रोतांवर अवलंबून असतात. सध्या जगात 20 असे देश आहेत जिथे एकही स्थायी नैसर्गिक नदी नाही. यात भारताच्या एका शेजारी देशाचा समावेश आहे.
मालदीवमध्ये एकही नदी का नाही?
हिंद महासागरात वसलेले मालदीव हे एक छोटे बेटराष्ट्र आहे. जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि सागरी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. मालदीव खरोखरच अशा देशांपैकी एक आहे जिथे कोणतीही नैसर्गिक नदी नाही. मालदीव हे सुमारे 1200 लहान प्रवाळ बेटांचे (coral islands) समूह आहे. ज्यापैकी अंदाजे 202 बेटांवरच लोकवस्ती आहे. ही बेटे हिंद महासागरात 871 किलोमीटर लांबीमध्ये पसरलेली आहेत. या बेटांची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून खूपच कमी आहे. जी साधारणतः एक मीटर आहे. याच कारणामुळे हा देश हवामान बदल आणि समुद्राच्या वाढत्या पातळीसाठी अत्यंत संवेदनशील आहे.
advertisement
मालदीव चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. हीच त्याची भौगोलिक स्थिती नद्यांच्या अनुपस्थितीचे मुख्य कारण आहे. इतक्या लहान आणि कमी उंचीच्या द्वीपसमूहांवर मोठ्या नद्या विकसित होण्यासाठी आवश्यक असा भूभाग आणि उतार उपलब्ध नाहीत. या देशाला पाण्याच्या अद्वितीय आव्हानांचा सामना करावा लागतो. विशेषतः समुद्राची पातळी वाढत असल्याने त्याच्या गोड्या पाण्याचे स्रोत धोक्यात आले आहेत. मालदीव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पावसाचे पाणी साठवणे, खारे पाणी गोड करणे (desalination) आणि बाटलीबंद पाण्याची आयात यावर अवलंबून आहे. जलसंधारण आणि शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली त्याच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
advertisement
पाकिस्तान आणि बांगलादेशच्या नद्या
पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अनेक प्रमुख नद्या शेजारील देशांतून येतात. या दोन्ही देशांमध्ये काही नद्या अशाही आहेत, ज्यांचा उगम त्यांच्या सीमेच्या आतच होतो. परंतु त्या तितक्या मोठ्या नाहीत.
पाकिस्तानच्या नद्या:
पाकिस्तानमधील बहुतांश प्रमुख नद्या जसे की सिंधू आणि तिच्या काही उपनद्या (झेलम, चेनाब, रावी, सतलज), यांचा उगम भारत किंवा तिबेट (चीन) मध्ये होतो. मात्र पाकिस्तानात काही नद्या अशाही आहेत ज्यांचा उगम पाकिस्तानच्या आतच होतो. यापैकी काही उपनद्या किंवा लहान नद्या आहेत.
advertisement
सर्वात मोठी नदी:
सिंधू ही पाकिस्तानची सर्वात लांब आणि सर्वात महत्त्वाची नदी आहे. तिला पाकिस्तानची जीवनरेखा असेही म्हटले जाते. ती तिबेटमधील मानसरोवर तलावाजवळून उगम पावते. भारतातून (लडाख) वाहत ती पाकिस्तानात प्रवेश करते आणि अरबी समुद्राला मिळते. तिची एकूण लांबी सुमारे 3,180 किलोमीटर आहे. पाकिस्तानची 80 टक्के शेतीयोग्य जमीन सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.
advertisement
सिंधूच्या उपनद्या:
सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज आहेत. विशेष म्हणजे या सर्व नद्या भारतातून पाकिस्तानात जातात. सिंधू नदीच्या काही लहान उपनद्या पाकिस्तानच्या डोंगराळ प्रदेशातही उगम पावतात. जसे की गिलगित, स्वात, कुनार, कुर्रम, गोमल, झोब आणि बोलन. यापैकी काही नद्या अफगाणिस्तानातूनही येतात.
झेलम नदी:
या नदीचा उगम जम्मू-काश्मीर (भारत) च्या अनंतनाग जिल्ह्यातील व्हेरिनाग नावाच्या ठिकाणातून होतो. परंतु ही नदी पाकिस्तानात बराच लांबचा प्रवास करते आणि चेनाब नदीला मिळते. ही देखील पाकिस्तानची अंतर्गत नदी नसून सीमा पार करणारी नदी आहे.
advertisement
बांगलादेशच्या नद्या:
बांगलादेशला 'नद्यांचा देश' म्हटले जाते, कारण येथे सुमारे 700 नद्या वाहतात. गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांसारख्या मोठ्या नद्या भारतातून बांगलादेशात प्रवेश करतात आणि तेथे वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. बांगलादेशमधील बहुतांश प्रमुख नद्या भारत किंवा इतर शेजारील देशांतून येतात. मात्र बांगलादेशच्या आतही काही नद्या उगम पावतात. या सीमा पार नद्यांच्या शाखा आणि उप-शाखा बनतात.
advertisement
दुसऱ्या देशातून येणाऱ्या नद्या:
पद्मा नदी: गंगा नदीची ही मुख्य धारा आहे. ती बांगलादेशात प्रवेश करताच 'पद्मा' या नावाने ओळखली जाते.
जमुना नदी: ब्रह्मपुत्रा नदीची ही शाखा आहे जी बांगलादेशात 'जमुना' या नावाने ओळखली जाते.
मेघना नदी: पद्मा आणि जमुना नद्या शेवटी एकत्र येऊन 'मेघना' नाव धारण करतात आणि बंगालच्या खाडीत मिळतात. मेघना ही बांगलादेशातील सर्वात रुंद नदी आहे. ती जगातील सर्वात मोठ्या सुंदरबन डेल्टाची निर्मिती करते.
बराक नदी:
बराक नदी मणिपूर टेकड्यांमधून (भारत) उगम पावते, परंतु बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर ती सुरमा आणि कुशियारा नावाच्या दोन प्रवाहांमध्ये विभागली जाते. बांगलादेशात या दोन्ही नद्यांचा पुन्हा संगम होतो आणि त्यानंतर ती मेघना नदी म्हणून ओळखली जाते. मेघना नदी ही बांगलादेशची एक मुख्य नदी आहे आणि तिच्या काही शाखा बांगलादेशच्या आतच उगम पावतात. बांगलादेशात अनेक लहान नद्या, शाखा आणि उप-शाखा आहेत ज्या स्थानिक पातळीवर उगम पावतात. विशेषतः सखल प्रदेशात किंवा मान्सून दरम्यान त्यांची जास्त माहिती उपलब्ध नाही. कारण त्यांचे महत्त्व प्रादेशिक असते. तीस्ता, सुरमा, कुशियारा, महानंदा आणि कर्णफूली या बांगलादेशात वाहणाऱ्या इतर प्रमुख नद्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/General Knowledge/
General Knowledge: भारताच्या या शेजारी देशात एकही नदी नाही; तर दुसऱ्या शेजारी देशात 700 नद्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement