'1660000000 रुपये मला द्या' प्रवाशाने थेट विमान कंपनीकडे केली मागणी, एअर होस्टेसची चूक आली समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
विमान प्रवासादरम्यान या ना त्या कारणावरून वाद आणि भांडणं होण्याचे प्रकार घडतच असतात. अशातच एका विमान प्रवासामध्ये...
मुंबई : विमान प्रवास म्हटला तर कुणाला धास्ती वाटते तर कुणाला विमान अपघाताची भीती वाटते. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाची विमान कंपन्यांकडून चांगली सेवा पुरवली जात असते. पण तरीही विमान प्रवासादरम्यान या ना त्या कारणावरून वाद आणि भांडणं होण्याचे प्रकार घडतच असतात. अशातच एका विमान प्रवासामध्ये प्रवाशाने विमान कंपनीकडे तब्बल 166 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
त्याचं झालं असं की, अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सच्या विमानात हा प्रकार घडला आहे. एका प्रवाशासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप समोर आला आहे. प्रवासी मोहम्मद शिबली यांनी एअरलाइनकडून 166 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. विमानात एका फ्लाइट एअर होस्टेसने थप्पड मारली, असा आरोप त्यांनी केला आहे. 29 जुलै रोजी शिबली आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसोबत (4 आणि 2 वर्षांचे) अटलांटा येथून फ्रेझ्नोला जात होते. विमानात त्यांचा लहान मुलगा पाणी मागण्यासाठी रडू लागला. शिबली यांच्या पत्नीने पाणी मागितल्यावर, एअर होस्टेसनं पाणी देण्यास नकार दिला.
advertisement
नेमकं घडलं काय?
यानंतर शिबली स्वतः मागे जाऊन एअर होस्टेसला लेकरासाठी पाणी मागितलं. पण तिथेही विमान कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी कडक भाषेत नकार दिला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली, नंतर दुसऱ्या एअर होस्टेसनं पाणी दिलं आणि माफीही मागितली. पण प्रकरण इथंच थांबलं नाही.
काही वेळाने, तीच एअर होस्टेस पुन्हा त्यांच्याकडे पाणी घेऊन आली. शिबली यांनी पाणी घेण्यास नकार दिला आणि तिला त्यांना एकटे सोडण्यास सांगितलं. त्याचवेळी, ती एअर होस्टेस त्यांच्या जवळून जाताना त्यांच्या कानात काहीतरी शिवीगाळ करून गेली. शिबली यांनीही तिला प्रतिउत्तर दिलं. तेव्हाच अचानक त्या एअर होस्टेसने त्यांच्या कानशिलात लगावली.
advertisement
'विमानात आरोपीसारखं वाटलं'
शिबली यांनी या प्रकारानंतर विमान कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी संपूर्ण प्रवासात संयम ठेवला, पण त्यांना अपमानित आणि असुरक्षित वाटलं. “मी जवळपास चार तास त्या विमानात अडकून पडलो होतो. माझ्या मुलासमोर मला वाईट वाटलं, तर पत्नीसमोर माझा अपमान झाला. कोणत्याही व्यक्तीला विमानात प्रवास करताना अशाप्रकारे शारीरिक हल्ल्याला सामोरं जावं लागू नये.” अशी व्यथा शिबली यांनी मांडली.
advertisement
विमानातून उतरल्यानंतर शिबली यांनी हे प्रकरण कोर्टात नेलं. त्यांचे वकील अली अवाद यांनी दावा केला आहे की, हे प्रकरण केवळ पाण्याचे नाही, तर वंशिक भेदभावाचं आहे. शिबली यांच्या पत्नीच्या टी-शर्टवर “Palestine” असं लिहिलेलं होतं. वकिलांनी या घटनेचा संबंध डेल्टा एअरलाइन्सच्या मागील एका घटनेशी जोडला, जेव्हा काही अटेंडंट्सनी पॅलेस्टिनी झेंड्याचे बॅज लावलं होतं आणि त्यांना सोशल मीडियावर “हमास बॅज” असं म्हटलं गेलं होतं.
advertisement
डेल्टाने कर्मचाऱ्याला केलं निलंबित
दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर एअरलाइनने एक निवेदन प्रसिद्ध केलं. यात आरोपी अटेंडंटला निलंबित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2025 10:20 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
'1660000000 रुपये मला द्या' प्रवाशाने थेट विमान कंपनीकडे केली मागणी, एअर होस्टेसची चूक आली समोर