Breaking news : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा

Last Updated:

मोठी बातमी समोर आली आहे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

News18
News18
दिल्ली, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर आली आहे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा इम्रान खान यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सायफर प्रकरणात इम्रान खान यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान आणि शाह महमूद कुरैशी या दोघांना सायफर प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील एका कोर्टानं मंगळवारी इम्रान खान यांना व पाकिस्तानचे माजी परराष्ट्र व्यवाहार मंत्री महमूद कुरेशींना सायफर प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
हे प्रकरण एका राजकीय दस्ताऐवजाशी संबंधित आहे. इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी अमेरिकेकडून धमकी देण्यात आली होती. असा आरोपी इम्रान खान यांच्याकडून करण्यात आला होता. याच प्रकरणाशी संबंधित हा दस्ताऐवज आहे.
advertisement
आठ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या आठवडाभर आधीच हा निकाल आला आहे. इम्रान खान अध्यक्ष असलेली पीटीआय पार्टी आधीच अडचणीत आहे, त्यामध्ये आता इम्रान खान यांच्यावर कारवाई झाल्यानं पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या एका विशेष कोर्टानं हा निर्णय दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Breaking news : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement