महाराष्ट्राच्या मुलांचे US Dream उद्ध्वस्त, करिअरवर वज्राघात; आता फक्त या लोकांना H-1Bच्या फीमधून सवलत

Last Updated:

H-1B Visa Exemptions: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांवर तब्बल $100,000 (88 लाख रुपये) शुल्क लावणारा नवा आदेश स्वाक्षरी केला आहे. या निर्णयाने लाखो भारतीय आयटी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर धोक्याचे सावट आले आहे.

News18
News18
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा कार्यकारी आदेश (Executive Order) स्वाक्षरी करून जाहीर केला आहे, ज्याअंतर्गत H-1B व्हिसाच्या प्रत्येक अर्जावर आता $100,000 (सुमारे ८८ लाख रुपये) शुल्क आकारले जाणार आहे. हा खर्च थेट त्या कंपन्यांना करावा लागणार आहे ज्या परदेशी कामगारांना अमेरिकेत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी नियुक्त करतात.
advertisement
कोणते अर्जदार फीमधून सूट मिळवतील?
या आदेशानुसार काही अपवाद ठेवले गेले आहेत :
१) आरोग्य (Healthcare) आणि अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रातील कामगारांवर ही फी लागू होणार नाही.
२) सध्याचे H-1B व्हिसा धारक या शुल्कातून मुक्त असतील. परंतु जर ते अमेरिकेबाहेर सलग 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ राहिले असतील तर त्यांना 21 सप्टेंबर 2025 पूर्वी पुन्हा अमेरिकेत प्रवेश घ्यावा लागेल अन्यथा त्यांच्यावरही नवा नियम लागू होईल.
advertisement
३) जर अमेरिकेचे गृहराज्यमंत्री (Secretary of Homeland Security) यांना असे वाटले की- एखाद्या क्षेत्रातील किंवा कामगारांचा उपयोग राष्ट्रीय हितासाठी, अर्थव्यवस्थेसाठी, सुरक्षेसाठी किंवा सार्वजनिक कल्याणासाठी महत्त्वाचा आहे. तर त्यांच्या निर्णयानुसार या शुल्काला सूट दिली जाऊ शकते.
advertisement
नव्या आदेशानुसार, कंपन्यांनी $100,000 फी भरल्याचा पुरावा दाखवल्याशिवाय H-1B व्हिसासाठी अर्ज दाखल करता येणार नाही. त्यामुळे थेट भार नियुक्ती करणाऱ्यावर टाकण्यात आला आहे.
H-1B व्हिसा कार्यक्रमावर परिणाम
advertisement
-2025 पर्यंत अमेरिकेत सुमारे 5 ते 6 लाख H-1B व्हिसा धारक राहतात.
-2024 आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या H-1B अर्जांपैकी सुमारे 71% अर्ज भारतीयांचे होते.
-त्यामुळे या बदलांचा सर्वाधिक परिणाम भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांवर होणार आहे.
advertisement
ट्रम्प यांचे मत
अनेक अमेरिकन नागरिकांच्या मते H-1B कार्यक्रमामुळे स्थानिक नोकऱ्या कमी होत आहेत. ट्रम्प यांनीही हेच प्रतिपादन करताना सांगितले की- हा कार्यक्रम मूळतः अत्यंत कुशल कामगारांसाठी होता, पण त्याचा वापर करून अमेरिकन कामगारांना स्वस्त परदेशी मजुरीने बदलले जात आहे.
advertisement
पुढे काय?
नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की आता केवळ उच्च दर्जाचे कौशल्य असणाऱ्यांनाच H-1B व्हिसा मंजूर केला जाईल. यामुळे अमेरिकन स्वप्न पूर्ण करणे भारतीयांसाठी आणखी कठीण होणार आहे.
मराठी बातम्या/विदेश/
महाराष्ट्राच्या मुलांचे US Dream उद्ध्वस्त, करिअरवर वज्राघात; आता फक्त या लोकांना H-1Bच्या फीमधून सवलत
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement