How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Ayatollah Ali Khamenei Eliminated: अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त एअर स्ट्राईकमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा भीषण अंत झाला असून, त्यांच्यासह इराणचे संपूर्ण लष्करी नेतृत्व एकाच धक्क्याने संपवण्यात आले आहे.
तेहरान: अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील सखोल गुप्तचर सहकार्याच्या आधारे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेची गुप्तचर संस्था Central Intelligence Agency (CIA) अनेक महिन्यांपासून खामेनेई यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. तेहरानमध्ये होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीची माहिती मिळताच अमेरिका-इस्रायलने हल्ल्याची वेळ बदलून त्या संधीचा फायदा घेतल्याचे सांगितले जाते.
तेहरानमधील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शासकीय संकुलावर झालेल्या या हल्ल्यानंतर तेथील ढिगाऱ्यातून उठलेला धूर ओसरला असेल. पण त्या ढिगाऱ्यामागे जवळपास पाच दशकं इराणला अमेरिकन धोक्यांपासून वाचवणाऱ्या सत्ताकेंद्राचा शेवट दडलेला आहे, अशी चर्चा आहे.
कसा झाला हल्ला?
हल्ला: ओमानच्या मध्यस्थीत सुरू असलेली चर्चा फसल्यावर शनिवारी सकाळी अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केला.
अचूक गुप्त माहिती: CIA महिन्यांपासून खामेनेई यांच्या हालचाली आणि दिनचर्येचा अभ्यास करत होती.
advertisement
अचानक बदललेली वेळ: मूळ हल्ला रात्री करायचा होता; मात्र शनिवारी सकाळच्या गुप्त बैठकीची माहिती मिळताच वेळ बदलण्यात आली.
मुख्य लक्ष्य: खामेनेईंसह IRGC प्रमुख, संरक्षण मंत्री आणि लष्करी परिषदेचे प्रमुख हे टार्गेटवर होते.
हल्ल्याची तीव्रता: इस्रायली लढाऊ विमानांनी खामेनेई राहत असलेल्या संकुलावर सुमारे 30 बॉम्ब टाकल्याचा दावा.
अंत: 86 वर्षीय खामेनेई ठार झाले. ते 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते होते.
advertisement
CIA ची भूमिका काय होती?
Central Intelligence Agency ने या संपूर्ण ऑपरेशनमध्ये निर्णायक भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. अनेक महिन्यांच्या पाळतीदरम्यान खामेनेईंची दिनचर्या, हालचालींचे पॅटर्न आणि सुरक्षित ठिकाणांची अचूक माहिती गोळा करण्यात आली.
शनिवारी सकाळी तेहरानमधील प्रमुख सरकारी संकुलात सर्वोच्च अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची ‘हाय फिडेलिटी’ (अत्यंत अचूक) माहिती CIA ला मिळाली. खामेनेई स्वतः उपस्थित राहणार असल्याची खात्री झाल्यावर ही माहिती इस्रायलशी तात्काळ शेअर करण्यात आली.
advertisement
हल्ल्याची वेळ का बदलली?
इराणचे राष्ट्रपती कार्यालय, सर्वोच्च नेत्यांचे कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद ही तिन्ही कार्यालये एकाच संकुलात आहेत. त्या दिवशी सर्व वरिष्ठ नेतृत्व एकत्र उपस्थित असणार असल्याने हल्ल्याची वेळ बदलून सकाळी करण्यात आली. जेणेकरून एका धक्क्यात सर्वात मोठे लक्ष्य साधता येईल.
कोण होते निशाण्यावर?

advertisement
अयातुल्ला अली खामेनेई – सर्वोच्च नेते
मोहम्मद पाकपूर – IRGC कमांडर-इन-चीफ
अजीज नासिरजादेह – संरक्षण मंत्री
अॅडमिरल अली शामखानी – लष्करी परिषदेचे प्रमुख
सैयद माजिद मौसावी – IRGC एयरोस्पेस फोर्स कमांडर
मोहम्मद शिराजी – उप गुप्तचर मंत्री
हल्ला कसा झाला?
The New York Times च्या वृत्तानुसार इस्रायलमधून सकाळी सुमारे 6 वाजता लढाऊ विमाने उड्डाण करून निघाली. दोन तास पाच मिनिटांनी तेहरान वेळेनुसार सकाळी 9:40 वाजता क्षेपणास्त्रे अत्यंत सुरक्षित संकुलावर आदळली.The Wall Street Journal च्या अहवालानुसार खामेनेईंच्या इमारतीची ओळख पटताच त्या परिसरावर सुमारे 30 बॉम्ब टाकण्यात आले.
advertisement
इराणच्या गुप्तचर यंत्रणेला किती फटका?
Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) च्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठा फटका बसल्याचे सांगितले जाते. इराणची सरकारी वृत्तसंस्था Islamic Republic News Agency (IRNA) ने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. मात्र इराणचा सर्वोच्च गुप्तचर अधिकारी बचावला असल्याचेही म्हटले जाते.
माहिती कोठून मिळाली?
मागील वर्षी झालेल्या 12 दिवसांच्या संघर्षात अमेरिका-इराण संवाद पद्धतींचा अभ्यास करण्यात आला होता. त्यावर आधारित खामेनेईंच्या हालचालींचे निरीक्षण अधिक धारदार करण्यात आले.
advertisement
Donald Trump यांनी जूनमध्येही दावा केला होता की अमेरिकेला खामेनेई कुठे आहेत याची माहिती आहे, असे वृत्त.
इराणची मोठी चूक?
तणावाच्या काळात इतके वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी एकत्र येणे आणि खामेनेई त्याच संकुलात उपस्थित राहणे ही गंभीर रणनीतिक चूक ठरल्याची चर्चा आहे. Reutersच्या अहवालानुसार बैठकीची वेळ बदलल्याची माहिती Mossad ला मिळाली होती आणि त्यानुसार हल्ल्याची टाइमिंग पुढे आणण्यात आली.
पुढे काय?
इराणची राजकीय रचना अशी आहे की प्रत्येक महत्त्वाच्या पदासाठी उत्तराधिकारी निश्चित केलेले असतात. त्यामुळे सर्वोच्च नेतृत्व गमावले तरी प्रणाली तग धरू शकते, असे विश्लेषकांचे मत.
खामेनेई कोण होते?

Ayatollah Ruhollah Khomeini यांच्या निधनानंतर 1989 मध्ये खामेनेई सर्वोच्च नेते झाले. इस्लामी क्रांतीनंतर उभारलेल्या व्यवस्थेला लष्करी आणि अर्धलष्करी चौकटीत मजबूत करण्याचे काम त्यांनी केले.
1980 च्या दशकातील इराकविरुद्धच्या युद्धादरम्यान ते इराणचे राष्ट्राध्यक्ष होते. त्या संघर्षकाळात पाश्चात्य देश Saddam Hussein यांना पाठिंबा देत असल्याची भावना इराणमध्ये होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेबद्दल त्यांच्यात खोल अविश्वास निर्माण झाला.
1981 मधील हल्ला
1981 मध्ये तेहरानमधील एका मशिदीत भाषण करताना टेपरेकॉर्डरमध्ये लपवलेला बॉम्ब फुटल्याने खामेनेई गंभीर जखमी झाले होते, पण ते बचावले. हा त्यांच्यावर झालेला पहिला मोठा हल्ला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 4:39 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी









