बायकोनं पतीचा फोन उघडला, पाहिलं असं काही, की सगळं संपलं…; काय होतं Mobileमध्ये? तुम्हीही थक्क व्हाल

Last Updated:

Husband-Wife: तुर्कीमध्ये एका नवऱ्यानं मोबाईलमध्ये पत्नीचं नाव ‘जाडी’ म्हणून सेव्ह केलं आणि हा छोटासा विनोद थेट घटस्फोटाच्या कोर्टात पोहोचला. न्यायालयाने दिलेला निर्णय इतका अनपेक्षित होता की संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडाली.

News18
News18
अंकारा: पती-पत्नीचं नातं असं असतं, ज्यात प्रेम, आपुलकी आणि थोडीफार भांडण हे सगळं आलंच असतं. मात्र या नात्यात चेष्टा-मस्करी जर जास्त झाली आणि त्यातून जोडीदार दुखावला गेला, तर नातं तुटण्याची वेळ येते. तुर्कस्तानमध्ये असंच एक विचित्र प्रकरण घडलं आहे.
advertisement
नात्यात एकमेकांना गोंडस किंवा मजेशीर टोपणनावांनी हाक मारणं हे अगदी सामान्य आहे. काही वेळा हे टोपणनाव प्रेम व्यक्त करण्यासाठी असतात, तर कधी हलक्याफुलक्या छेडछाडीच्या अंदाजात वापरले जातात. पण तुर्कीतील एका जोडप्याचं असंच एक टोपणनाव त्यांच्या वैवाहिक आयुष्याचं वादळ येण्याचे कारण ठरले आणि अखेरीस घटस्फोटापर्यंत प्रकरण पोहोचलं.
advertisement
पतीने स्वतःच्या मोबाईलमध्ये पत्नीचं नाव काहीसं असं सेव्ह केलं होतं की ते पाहून बायको संतापली. तिने पतीचं म्हणणं न ऐकता थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. हे प्रकरण जेव्हा न्यायाधीशांपुढे आलं, तेव्हा ते सुद्धा थक्क झाले. मात्र त्यानंतर न्यायालयाने जो निर्णय दिला, त्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली.
advertisement
पत्नीचं नाव सेव्ह केलं होतं...
घटस्फोटाच्या खटल्यादरम्यान ही बाब समोर आली. पतीने आपल्या मोबाईलमध्ये पत्नीचा नंबरTombikया नावाने सेव केला होता. तुर्की भाषेत या शब्दाचा अर्थ होतो जाडी’. साधारणपणे असे शब्द आपण विनोदाने किंवा गोडीगुलाबीत वापरतो. भारतातही अनेक जण प्रेमाने आपल्या जोडीदाराला ‘लठ्ठ किंवा जाडी’ म्हणतात. त्यातून काही वाद निर्माण होत नाही. मात्र तुर्कीमध्ये मात्र या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं.
advertisement
न्यायालयाने काय म्हटलं?
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने मात्र ही बाब हलक्यात घेतली नाही. स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, तुर्कीच्या न्यायालयाने पतीला चुकीचं ठरवत निर्णय दिला की पत्नीला ‘जाडी’ म्हणणं किंवा तिचं नाव त्या प्रकारे मोबाईलमध्ये सेव्ह करणं हे भावनिक हिंसेच्या (Emotional Violence) श्रेणीत येतं.
advertisement
न्यायालयाने पुढे आदेश दिला की पतीने पत्नीला आर्थिक आणि मानसिक नुकसानभरपाई द्यावी. या निर्णयानंतर हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
काहींना हा निर्णय विचित्र वाटला, तर काहींनी न्यायालयाचं समर्थन केलं. एका यूजरने लिहिलं- माझ्या मोबाईलमध्ये तर याहून विचित्र नावं सेव आहेत.दुसऱ्याने म्हटले की जाडी असं म्हणणं हे काही वाईट शब्द नाहीत. अनेकदा हे प्रेमाने म्हटलेले शब्द असतात. कदाचित त्या पतीचा हेतूही वाईट नसावा.
advertisement
या प्रकरणाविषयी काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला की पतीला जेलची शिक्षाही झाली आहे, परंतु अधिकृतरीत्या याची पुष्टी झालेली नाही.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
बायकोनं पतीचा फोन उघडला, पाहिलं असं काही, की सगळं संपलं…; काय होतं Mobileमध्ये? तुम्हीही थक्क व्हाल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement