इमरान खान जिवंत की मृत? बहिणींना मिळाली तातडीने तुरुंगात एन्ट्री, पाकिस्तानात आंदोलक आक्रमक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
तुरुंगात शिक्षा भोगत असलेले इम्रान खान यांचा कोठडीत मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. या अफवांमुळे पाकिस्तानच्या आदियाला तुरुंगाबाहेर गेली दोन दिवस मोठा तणाव निर्माण झाला होता.
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या मृत्यूच्या अफवांसंबंधित चर्चा आहेत. अशातच आदियाला तुरुंगात जाऊन मंगळवारी त्यांची बहीण डॉ. उजमा खान यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तुरुंगाबाहेर अनेक आंदोलनकर्ते असल्याने प्रशासनाने त्यांना आतमध्ये बोलावून इमरान यांच्याशी भेट घालून दिली.
तुरुंगात शिक्षा भोगत असलेले इम्रान खान यांचा कोठडीत मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. या अफवांमुळे पाकिस्तानच्या आदियाला तुरुंगाबाहेर गेली दोन दिवस मोठा तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर इमरान यांच्या भगिनीने त्यांची तुरुंगात जाऊन भेट घेतली.
माझा भाऊ इम्रान जिवंत आहे. त्याची प्रकृती देखील स्थित आहे, असे डॉ. उजमा खान यांनी सांगून त्यांच्या मृत्यूच्या अफवा स्पष्टपणे फेटाळून लावल्या. तुरुंग प्रशासन इमरान यांना त्रास देत आहे. पाकिस्तान सरकार त्याचा मानसिक छळ करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
advertisement
गेल्या महिन्याभरापासून इमरान खानच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने त्यांची भेट घेतली नव्हती. तुरुंग प्रशासन परवानगी देत नसल्याचे कारण कुटुंबियांनी सांगितले होते. त्यानंतरच इमरान खान यांच्या प्रकृतीविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
मंगळवारी इमरान खान यांच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर आंदोलन करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांचे आक्रमक रुप पाहून रावलपिंडी शहरात सरकारने कलम १४४ लागू केले. तसेच सभांवरही निर्बंध आणले गेले आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार रावळपिंडीचे उपायुक्त डॉ. हसन वकार चीमा यांनी १ ते ३ डिसेंबर दरम्यान पंजाब सुधारणा कायदा २०२४ अंतर्गत कलम १४४ लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. या काळात, पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या कोणत्याही मेळाव्या, बैठका, धरणे, रॅली, मिरवणूक, निदर्शनांवर पूर्णपणे बंदी असेल.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
December 02, 2025 8:28 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
इमरान खान जिवंत की मृत? बहिणींना मिळाली तातडीने तुरुंगात एन्ट्री, पाकिस्तानात आंदोलक आक्रमक


