Ind Vs Pak Tension: कंडे, वानी,अहमद गनी हिटलिस्टवर; 6 दहशतवाद्यांचा खात्मा तर 8 जणांचा लवकरच हिशोब
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Ind Vs Pak Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविरोधात मोहिम उघडली आहे.
मुंबई : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं आता जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन क्लीन अप सुरु केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या 72 तासात या यादीतील 6 दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यानं खात्मा केलाय. तर उरलेल्या 8 जणांचा शोध सुरु आहे.
आसिफ अहमद शेख, आमिर नझीर वाणी, यावर अहमद भट्ट यांच्यासह शाहिद कुट्टे, अदनान शफी डार आणि आमिर अहमद डार यांचा खात्मा करण्यात आला आहे. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैय्यबाच्या या दहशतवाद्यांचा भारतीय सुरक्षा यंत्रणांनी खात्मा केला. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. एकाच वेळी काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं.
advertisement
दहशतवाद्यांकडे सैन्यानं आपला मोर्चा वळवला
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं. आता जम्मू काश्मीरातील स्थानिक दहशतवाद्यांकडे सैन्यानं आपला मोर्चा वळवला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर मधील 14 दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 6 जणांचा खात्मा झालाय तर 8 जण टार्गेटवर आहेत.
advertisement
कोणकोणत्या दहशतवाद्यांचा समावेश?
त्यात लष्कर ए तोयबाचा सोपोरमधील कमांडर आदिल रहमान देंतू, पुलवामात सक्रिय असलेला एलईटीचाच एहसान अहमद शेख.. हरीश नजीर, हिजबुल मुजाहिद्दीनचा आसिफ अहमद कंडे, पाकिस्तानी दहशतवाद्यांना रसद पुरवणारा नसीर अहमद वानी यासोबतच जुबेर अहमद वानी जो हिजबुल मुजाहिद्दीनचा अनंतनागचा ऑपरेशनल कमांडर, हारून रशीद गनी आणि सुरक्षा दलांवर वारंवार हल्ले करणारा लष्कर ए तोयबाचा जाकीर अहमद गनी यांचा समावेश आहे.
advertisement
जगालाही दिला थेट इशारा
ऑपरेशन सिंदूर असो, ऑपरेशन केलर असो किंवा ऑपरेशन नादेर असो...सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन राबवलं जात आहे.
या यशस्वी ऑपरेशन्समधून भारतीय सैन्यानं पाकिस्तानलाच नव्हे तर जगालाही थेट इशारा दिलाय. तो म्हणजे दहशतवादाला इथे थारा नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 16, 2025 9:02 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Ind Vs Pak Tension: कंडे, वानी,अहमद गनी हिटलिस्टवर; 6 दहशतवाद्यांचा खात्मा तर 8 जणांचा लवकरच हिशोब