IND vs PAK: 220 अधिक भारतीयांच्या जीवाशी खेळ, पाकिस्तान कर्माने मरणार; ऑपरेशन सिंदूरनंतरची मोठी कारवाई
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Pakistani Aircraft And Airlines: भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपली हवाई हद्दबंदी जून महिन्यापर्यंत वाढवली आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने हा कठोर निर्णय घेतला आहे. तर पाकिस्ताननेही भारतीय विमानांना आपल्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे.
नवी दिल्ली/इस्लामाबाद: भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपली हवाई हद्दबंदी आणखी एका महिन्यासाठी वाढवली आहे. भारतीय विमान वाहतूक प्राधिकरणाने शुक्रवारी जारी केलेल्या 'नोटिस टू एअरमेन' (NOTAM) नुसार आता ही बंदी 23 जूनपर्यंत लागू राहील.
पाकिस्तानमधील एअरलाईन्सद्वारे नोंदणीकृत संचालित मालकीची किंवा भाड्याने घेतलेल्या सर्व विमानांना तसेच लष्करी विमानांना हा प्रतिबंध लागू असेल. ही बंदी सुरुवातीला 30 एप्रिल रोजी पाकिस्तानी विमानांसाठी लागू करण्यात आली होती.
किम जोंग उनचे डोकं फिरले, Navy Chiefला देणार क्रूर मृत्यूदंड; उत्तर कोरियात खळबळ
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध अधिकच बिघडले आहेत.
advertisement
या घडामोडी अशा वेळी समोर आल्या आहेत जेव्हा पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्दबंदी 24 जूनपर्यंत वाढवली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कठोर कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने 24 एप्रिल रोजी भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती.
ही घोषणा लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) एका भारतीय विमानाला तात्पुरती पाकिस्तानी हवाई हद्द वापरण्याची परवानगी नाकारल्याच्या एक दिवसानंतर आली आहे. त्या भारतीय विमानाला खराब हवामानामुळे पाकिस्तानी हद्देतून जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. यामुळे इंडिगोच्या त्या विमानाला त्याच्या मूळ मार्गावरूनच प्रवास करावा लागला आणि त्याला तीव्र वादळाचा सामना करावा लागला. 220 हून अधिक प्रवासी असलेल्या त्या विमानावर गारपिटीचा मारा झाला. ज्यामुळे त्याच्या उड्डाण प्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला. विमान सुरक्षितपणे उतरले असले तरी विमानाचे "नोज रॅडोम" खराब झाले होते.
advertisement
दरम्यान आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) च्या नियमांनुसार, अशा प्रकारची हवाई हद्दबंदी एका वेळी एका महिन्यापेक्षा जास्त काळ करता येत नाही.
भारताने 7 मे रोजी पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत अचूक हल्ले केल्यानंतर दोन्ही शेजारी देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही हवाई हद्दबंदी वाढवण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेला हा थेट लष्करी प्रतिसाद होता. या हल्ल्यात 26 नागरिक ठार झाले होते, जो 26/11 मुंबई हल्ल्यांनंतर नागरिकांवरील सर्वात मोठा हल्ला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 23, 2025 7:57 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
IND vs PAK: 220 अधिक भारतीयांच्या जीवाशी खेळ, पाकिस्तान कर्माने मरणार; ऑपरेशन सिंदूरनंतरची मोठी कारवाई


