किम जोंग उनचे डोकं फिरले, Navy Chiefला देणार क्रूर मृत्यूदंड; उत्तर कोरियात खळबळ

Last Updated:

North Korea: उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांच्या महत्त्वाकांक्षी 5,000 टन वजनाच्या विध्वंसक जहाजाच्या लाँचमध्ये मोठी गडबड झाली आहे. यामुळे किम चांगलेच संतापले असून दोषींना कठोर शिक्षा देण्याचे फर्मान त्यांनी काढले आहे.

News18
News18
सोल: उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-उन चोंगजिन बंदरावर 5,000 टन वजनाचे विध्वंसक जहाज लाँच करताना झालेल्या अपमानास्पद अपयशाने चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या घटनेला ‘गुन्हेगारी निष्काळजीपणा’ असे संबोधत, याला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी केंद्रीय लष्करी आयोगाने या घटनेला ‘अक्षम्य गुन्हा’ ठरवत. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. किम जोंग-उन दोषींना तोफेसमोर उभे करून गोळ्या घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर कोरियाचा इतिहास अशा क्रूर शिक्षांनी भरलेला आहे. 2015 मध्ये संरक्षण मंत्री ह्योन योंग-चोल यांना कथितपणे तोफेने उडवून मारण्यात आले होते. तसेच 2024 मध्ये पूर नियंत्रणात अपयशी ठरलेल्या 30 अधिकाऱ्यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. या घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवरही मृत्यूदंडाची तलवार लटकत आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
KCNA च्या वृत्तानुसार बुधवारी चोंगजिन शिपयार्डमध्ये जहाज लाँच करत असताना जहाजाच्या मागील भागातील परिवहन पाळणा (transport cradle) तुटला. यामुळे विध्वंसक जहाज एका बाजूला कलंडले आणि आंशिकरित्या पाण्याखाली गेले. सॅटेलाईट फोटोंमध्ये हे जहाज निळ्या तिरपालने झाकलेले दिसत आहे. उत्तर कोरियाने दावा केला आहे की जहाजाच्या स्टारबोर्ड बाजूला काही ओरखडे आले आहेत आणि मागील भागात थोडे समुद्री पाणी शिरले आहे. जे 10 दिवसांत दुरुस्त केले जाईल. मात्र तज्ज्ञांनी हा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.
advertisement
अपयशाची कारणे काय?
सोलमधील एका विद्यापीठातील नौदल तज्ज्ञ मून क्यून-सिक यांच्या मते, उत्तर कोरियाच्या कामगारांना इतक्या मोठ्या युद्धनौकेला हाताळण्याचा अनुभव नव्हता. हे जहाज त्यांच्या सध्याच्या जहाजांपेक्षा तीन पट अधिक वजनाचे आहे. जहाजाला बाजूने लाँच (sideways launch) करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जो युद्धनौकांसाठी नवीन आणि जोखमीचा होता. तसेच जहाज भरपूर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असल्यामुळे त्याचा समतोल बिघडला. ज्याकडे कदाचित वैज्ञानिकांनी दुर्लक्ष केले असावे.
advertisement
किम यांचा तीव्र संताप
गेल्या महिन्यात पाश्चात्त्य शिपयार्डमध्ये लाँच झालेल्या उत्तर कोरियाच्या सर्वात मोठ्या युद्धनौकेसारखेच हे विध्वंसक होते. ज्याला किम यांनी ‘नौदल आधुनिकीकरणाचे’ उत्तम उदाहरण म्हटले होते. या अपयशाने त्यांची अत्यंत नाचक्की झाली आहे. किम यांनी जूनमधील वर्कर्स पार्टीच्या बैठकीपूर्वी जहाज दुरुस्त करण्याचे आणि संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चोंगजिन शिपयार्डचे व्यवस्थापक होंग किल हो यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आयोगाने इशारा दिला आहे की, जहाज कितीही चांगले असले तरी हा गुन्हा माफ केला जाणार नाही. उत्तर कोरियाच्या गोपनीय कार्यपद्धतीमुळे अचूक माहिती मिळवणे कठीण आहे. परंतु त्यांचा इतिहास दर्शवतो की अपयशाची किंमत प्राणांनी चुकवावी लागते.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
किम जोंग उनचे डोकं फिरले, Navy Chiefला देणार क्रूर मृत्यूदंड; उत्तर कोरियात खळबळ
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement