पैसे उधार दिले असतील, तर ते त्वरित परत घ्या; Share Market मध्ये उडणार धुरळा, श्रीमंत होण्याच्या 150 संधी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Money Making: गेल्या काही महिन्यांपासून सुस्त असलेल्या शेअर बाजारात आता पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल 150 हून अधिक कंपन्या त्यांचे IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) घेऊन बाजारात येत असल्याने, गुंतवणूकदारांना नवीन आणि मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मुंबई: गेल्या काही काळापासून शेअर बाजारात असलेल्या घसरणीमुळे IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) बाजारात थोडी शांतता होती. पण आता पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. तब्बल 150 हून अधिक कंपन्या शेअर बाजारात उतरण्यास सज्ज आहेत. यामुळे गुंतवणुकीचे नवीन आणि मोठे संधी उपलब्ध होणार आहेत. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते त्वरित परत घ्या. कारण लवकरच गुंतवणुकीसाठी जवळपास 200 संधी उपलब्ध होणार आहेत.
का येतोय हा पूर?
IPO ही ती प्रक्रिया आहे. जिथे एखादी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स सामान्य लोकांना विकते, जेणेकरून कंपनीला भांडवल उभारता येते. मर्चंट बँकर्सच्या मते येत्या 5-6 महिन्यांत 150 ते 200 कंपन्या त्यांचे DRHP (Draft Red Herring Prospectus) म्हणजेच प्रारंभिक कागदपत्रे दाखल करण्याची तयारी करत आहेत. याचा थेट अर्थ असा की, सामान्य गुंतवणूकदारांसाठी नवीन आणि मोठ्या संधींनी भरलेले पर्याय लवकरच उपलब्ध होतील.
advertisement
सेबीकडे 75 कंपन्यांची कागदपत्रे दाखल
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (SEBI) च्या आकडेवारीनुसार, या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच 75 हून अधिक कंपन्यांनी IPO संबंधित कागदपत्रे दाखल केली आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ही संख्या दुप्पट होऊ शकते.
असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडिया (AIBI) चे अध्यक्ष महावीर लुनावत यांच्या मते, IPO बाजार हळूहळू गती पकडत आहे आणि पुढील काही तिमाहींमध्ये 200 हून अधिक कंपन्या DRHP दाखल करू शकतात. ही वाढ कंपन्यांच्या प्रवर्तकांचा आत्मविश्वास वाढल्याचे, देशांतर्गत बाजारात तरलता (लिक्विडिटी) सुधारत असल्याचे आणि आर्थिक वातावरणही अनुकूल होत असल्याचे संकेत देते.
advertisement
कोणत्या क्षेत्रातील कंपन्या आणणार IPO?
तंत्रज्ञान (Technology), अक्षय ऊर्जा (Renewable Energy), अभियांत्रिकी (Engineering), फार्मा (Pharma), उत्पादन (Manufacturing) आणि ग्राहक सेवा (Consumer Service) यांसारखे प्रमुख क्षेत्रे यावेळी IPO च्या पुढील लाटेचे नेतृत्व करू शकतात. ही अशी क्षेत्रे आहेत जिथे गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याची अपेक्षा असते आणि कंपन्याही त्यांचे मूल्यांकन वाढवण्यासाठी शेअर बाजाराचा आधार घेत आहेत.
advertisement
बाजाराची स्थिती
महिनानिहाय आकडेवारी पाहिली असता, जानेवारी 2025 हा IPO फाइलिंगच्या दृष्टीने सर्वोत्तम महिना ठरला. ज्यात 25 हून अधिक कंपन्यांनी DRHP दाखल केले. त्यानंतर फेब्रुवारी (13) आणि मार्च (10) मध्ये बाजारातील अस्थिरतेमुळे थोडी घसरण दिसून आली. फेब्रुवारीमध्ये सेन्सेक्सने 5.5% पेक्षा जास्त घसरण नोंदवली होती. परंतु मार्चमध्ये त्यात पुन्हा सुधारणा झाली.
एप्रिलमध्ये सेन्सेक्समध्ये जवळपास 3.7% वाढ झाली असताना 20 कंपन्यांनी आपली कागदपत्रे दाखल केली. मे महिन्यात आतापर्यंत अर्धा डझनहून अधिक कंपन्यांनी IPO ची कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यात कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स (Canara HSBC Life Insurance) आणि कॅनरा रोबोको असेट मॅनेजमेंट (Canara Robeco Asset Management) सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
advertisement
प्राइम डेटाबेसनुसार, सुमारे 70 कंपन्यांना SEBI ची मंजुरी मिळाली आहे आणि त्या कधीही बाजारात प्रवेश करू शकतात.
उत्तम परतावा
ॲक्सिस कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीक लूनकर यांनी सांगितले, IPO चा बाजार सुरुवातीला थोडी सावधगिरी बाळगेल. परंतु लवकरच तो अधिक कंपन्यांसाठी खुला होईल. जर बाजार स्थिर राहिला तर वर्षाची दुसरी सहामाही IPO च्या दृष्टीने अत्यंत शानदार राहू शकते.
advertisement
गेले वर्ष म्हणजे 2024मध्ये IPO च्या बाबतीत विक्रमजनक ठरले होते. ज्यात 91 कंपन्यांनी एकूण 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती. तर या वर्षी एप्रिलपर्यंत 10 कंपन्यांनी एकूण 18,704 कोटी रुपये जमा केले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 23, 2025 12:04 AM IST
मराठी बातम्या/मनी/
पैसे उधार दिले असतील, तर ते त्वरित परत घ्या; Share Market मध्ये उडणार धुरळा, श्रीमंत होण्याच्या 150 संधी


