Ind vs Pak: अमेरिकेचा पाकला दणका, संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, तुर्कीची भूमिका काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वेन्स यांनी भारत-पाकिस्तान तणावात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वेन्स यांनी या संघर्षात हस्तक्षेप न करण्याचा स्पष्ट पवित्रा घेतला आहे. "हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत वाद आहे. अमेरिका यात पडणार नाही," असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. वेन्स यांनी Fox News ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "अमेरिका दोन्ही देशांना शांतता राखण्यासाठी प्रोत्साहित करू शकते, मात्र ज्या वादांशी आमचा थेट संबंध नाही, त्या वादांमध्ये पडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही भारताला किंवा पाकिस्तानला संघर्ष न करण्याचे आदेश देऊ शकत नाही. आमचा मार्ग केवळ राजनैतिक चर्चेचा असेल."
दरम्यान, अमेरिका भारत आणि पाकिस्तानला सातत्याने चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन करत आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, याच पार्श्वभूमीवर अमेरिका मध्यस्थी करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
advertisement
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, "रुबियो यांनी दोन्ही नेत्यांना संयम बाळगण्याचे आणि संवाद सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ब्रूस यांनी ही परिस्थिती “अत्यंत नाजूक आणि धोकादायक” असल्याचे सांगितले. पत्रकारांनी रुबियो यांच्या मध्यस्थीच्या भूमिकेबद्दल विचारणा केली असता, त्या म्हणाल्या, "सध्या चर्चा सुरू आहे. पण त्या खासगी आहेत. माध्यमांमध्ये त्याचे तपशील देणे योग्य ठरणार नाही."
advertisement
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान यांनीही भारत-पाकिस्तान वादाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. "आम्ही वाढत्या संघर्षाबद्दल चिंतेत आहोत. शांतता राखण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न करू," असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या संघर्षात आता पाकिस्तानला उघड सपोर्ट करणारं कोणीही अजून तरी पुढे सरसावले नाहीत असंच दिसत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 09, 2025 5:57 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Ind vs Pak: अमेरिकेचा पाकला दणका, संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, तुर्कीची भूमिका काय?


