अमेरिकेची मजबुरी बनली भारताची ताकद, रशिया करणार मदत, येणार नाही पेट्रोल डिझेलचं संकट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमेरिकेने रशियन तेलावरचे निर्बंध भारतासाठी ३० दिवसांकरिता शिथिल केले आहेत. अमेरिकेची ही मजबुरी आता भारताची ताकद बनली आहे.
मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे संपूर्ण जगात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या युद्धामुळे अमेरिकेला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि नाइलाजानं का होईना पण भारताला रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्याची परवानगी द्यावी लागली.
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारताला ३० दिवसांची विशेष सवलत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून समुद्रात रखडलेली रशियाची अवाढव्य तेल जहाजे आता भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती असतानाच, अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिला.
रशियावर लादलेल्या कडक निर्बंधांमधून अमेरिकेने भारतासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून समुद्रात असलेली रशियन तेलाची जहाजं आता भारताच्या दिशेनं येत आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियाच्या तेल व्यापारावर अनेक निर्बंध लादले होते. यामुळे रशियाची अनेक तेलवाहू जहाजे (टँकर्स) समुद्रातच उभी होती. त्यांना ना खरेदीदार मिळत होते, ना विम्याची सुरक्षा. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली होती, पण अमेरिकेच्या नव्या निर्बंधांमुळे भारतीय कंपन्यांनीही काही काळ सावध पवित्रा घेतला होता. मात्र, आता इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये, म्हणून अमेरिकेने नमती भूमिका घेतली.
advertisement
भारताला तेल मिळणार!
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या या ३० दिवसांच्या सवलतीमुळे भारतीय तेल कंपन्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी कंपन्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू केली असून, सुमारे २० दशलक्ष बॅरल रशियन तेल खरेदीची प्रक्रिया वेगवान झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या कंपन्यांना नोव्हेंबरपासून रशियन तेल मिळालं नव्हतं, त्यांच्यासाठी हा मार्ग आता मोकळा झाला आहे.
advertisement
भारताची ठाम भूमिका फळाला आली!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी रशियन तेल खरेदीवरून भारताला इशारा दिला होता. मात्र, भारताने नेहमीच स्पष्ट केलं होतं की, आम्ही तेल कोणाकडून खरेदी करायचं, हा आमचा निर्णय आहे. आता इराण युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अमेरिकेलाही भारताच्या या भूमिकेसमोर झुकावं लागलं.
रशियाकडून स्वस्त तेल मिळाल्यास देशांतर्गत बाजारात इंधन दरवाढ रोखता येईल. युद्धाच्या काळातही भारताला इंधनाची कमतरता भासणार नाही. अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता स्वतःच्या फायद्याचा निर्णय घेण्यास भारत यशस्वी ठरला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 7:44 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेची मजबुरी बनली भारताची ताकद, रशिया करणार मदत, येणार नाही पेट्रोल डिझेलचं संकट








