advertisement

Pune Crime : घरात बायको असतानाही त्याचे दुसरीसोबतच संबंध; पत्नीनं जाब विचारताच पतीनं दगड उचलला अन्.., पुण्यात धक्कादायक घटना

Last Updated:

राममणी कुशवाहा (रा. म्हाळुंगे, खेड) याचे त्याच्याच नात्यातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते.

पतीचे विवाहबाह्य संबंध (प्रतिकात्मक फोटो)
पतीचे विवाहबाह्य संबंध (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी-चिंचवड : नात्यातील एका तरुणीसोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचं रूपांतर एका भीषण हल्ल्यात झालं. आपल्या प्रेमसंबंधाला अडसर ठरत असल्याच्या रागातून पतीने चक्क आपल्या २२ वर्षीय पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या हल्ल्यातून पत्नी बचावली असून मावळच्या सुदवडी परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
भंडारा डोंगराच्या पायथ्याला थरार
मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी राममणी कुशवाहा (रा. म्हाळुंगे, खेड) याचे त्याच्याच नात्यातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. बुधवारी (४ मार्च) दुपारी आरोपीने पत्नीला सुदवडी (ता. मावळ) येथील भंडारा डोंगराच्या पायथ्याला नेले. तिथे पुन्हा एकदा याच कारणावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापलेल्या राममणीने तिथे पडलेला एक मोठा दगड उचलून थेट पत्नीच्या डोक्यावर आणि शरीरावर मारून तिला गंभीर जखमी केले.
advertisement
पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीने याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली आणि आरोपी पती राममणी कुशवाहा याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : घरात बायको असतानाही त्याचे दुसरीसोबतच संबंध; पत्नीनं जाब विचारताच पतीनं दगड उचलला अन्.., पुण्यात धक्कादायक घटना
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement