advertisement

Iran US Conflict: २० हजाराचं ड्रोन पाडायला ४० लाखांचं मिसाईल, इराणच्या जाळ्यात अलगद अडकली अमेरिका!

Last Updated:

Iran US Israel Conflict: इराणने आपल्या 'शहीद-१३६' या आत्मघाती ड्रोनच्या साहाय्याने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. या सगळ्यात अमेरिका आता इराणच्या जाळ्यात अडकत चालली आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

२० हजाराचं ड्रोन पाडायला ४० लाखांचं मिसाईल, इराणच्या जाळ्यात अलगद अडकली अमेरिका!
२० हजाराचं ड्रोन पाडायला ४० लाखांचं मिसाईल, इराणच्या जाळ्यात अलगद अडकली अमेरिका!
वॉशिंग्टन/तेहरान: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता पाचव्या दिवशी अधिक गडद झाला आहे. हे युद्ध आता अशा वळणावर आले आहे जिथे लष्करी ताकदीपेक्षा 'शस्त्रसाठा' कोणाकडे जास्त काळ टिकणार, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. इराणने आपल्या 'शहीद-१३६' या आत्मघाती ड्रोनच्या साहाय्याने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले असून, या ड्रोननी बहरीनपासून संयुक्त अरब अमिरातीपर्यंत अमेरिकेच्या लष्करी तळांवर हाहाकार उडवला आहे. मात्र, या सगळ्यात अमेरिका आता इराणच्या जाळ्यात अडकत चालली आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

महागडी क्षेपणास्त्रे विरुद्ध स्वस्त ड्रोन्स

या युद्धात अमेरिकेची 'पॅट्रियट एअर डिफेन्स' सिस्टिम इराणचे ड्रोन्स रोखण्यात ९० टक्के यशस्वी ठरली आहे. मात्र, यात एक मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. इराणचे एक ड्रोन साधारण २० हजार डॉलर्सचं (सुमारे १६-१८ लाख रुपये) आहे, पण ते पाडण्यासाठी अमेरिकेला ४० लाख डॉलर्स (सुमारे ३३ कोटी रुपये) किमतीचे क्षेपणास्त्र डागावे लागत आहे. हा खर्च अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
advertisement

इराणची रणनीती काय?

तज्ज्ञांच्या मते, इराण शत्रूला हळूहळू थकवण्याची रणनीती (War of Attrition) अवलंबत आहे. इराणचा असा अंदाज आहे की, सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे अमेरिका आणि आखाती देशांकडील महागडी क्षेपणास्त्रे संपतील, ज्यामुळे त्यांच्यावर युद्ध थांबवण्यासाठी राजकीय दबाव निर्माण होईल. त्याशिवाय, महत्त्वाची आणि शत्रूंचे नुकसान करणारी क्षेपणास्त्रे इराण अखेरच्या टप्प्यात वापरू शकतो, असं म्हटले जात आहे.
advertisement
ड्रोन हल्ले रोखले नाही तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल आणि या ड्रोनला रोखण्यासाठी महागडी क्षेपणास्त्रे वापरावी लागत आहेत, अशा दुहेरी चक्रात अमेरिका अडकली आहे.

कोणाकडे किती दारुगोळा शिल्लक?

युद्धाच्या सुरुवातीला इराणकडे सुमारे २,००० बॅलिस्टिक मिसाइल्स होती. आतापर्यंत इराणने १,२०० हून अधिक मिसाइल्स आणि ड्रोन्स डागले आहेत. इराण अद्याप आपली सर्वात घातक क्षेपणास्त्रे राखून ठेवत असल्याचे दिसते.
advertisement
इस्रायलचा दावा आहे की त्यांनी इराणचे १५० मिसाइल लाँचर्स उद्ध्वस्त केले आहेत. मात्र, अमेरिकेने या भागात दीर्घकाळ युद्ध चालेल इतका साठा आधीच पाठवला नसल्याचे संकेत मिळत आहेत. इराणकडून एवढा कडवा प्रतिकार होईल, याची अपेक्षा अमेरिकेने केली नव्हती. त्यामुळे काही दिवसांचा शस्त्रसाठा अमेरिकेकडे होता. मात्र, आता युद्ध दीर्घकाळ चालणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत.
advertisement
सध्या इराणची हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense) कमकुवत झाली असून रशियाकडून मिळालेली आधुनिक S-300 सिस्टिमही निकामी झाली आहे. यामुळे अमेरिकन आणि इस्रायली लढाऊ विमाने इराणच्या आकाशात विनाअडथळा वावरत आहेत. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर काही दिवसांत दोन्ही बाजूंकडे हल्ल्यासाठी किंवा बचावासाठीची साधने संपून युद्ध ठप्प होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: २० हजाराचं ड्रोन पाडायला ४० लाखांचं मिसाईल, इराणच्या जाळ्यात अलगद अडकली अमेरिका!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement