Dnyanada Show : शेख हसीना भारतात कशा आल्या? लष्करी ऑपरेशनची Inside Story, सांगतेय ज्ञानदा

Last Updated:

बांगलादेशातल्या अभूतपूर्व हिंसेमुळे, विद्यार्थी आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी आपल्या मायभूमीतून पलायन करावं लागलं. हसीना यांच्या बांगलादेशातल्या पलायनानंतर त्यांनी राजकीय आश्रयासाठी भारताची वाट धरली.

शेख हसीना भारतात कशा आल्या? लष्करी ऑपरेशनची Inside Story, सांगतेय ज्ञानदा
शेख हसीना भारतात कशा आल्या? लष्करी ऑपरेशनची Inside Story, सांगतेय ज्ञानदा
मुंबई : बांगलादेशातल्या अभूतपूर्व हिंसेमुळे, विद्यार्थी आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी आपल्या मायभूमीतून पलायन करावं लागलं. सोमवारी दुपारी सव्वा तीनची वेळ, शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याची आणि देश सोडल्याची बातमी अधिकृत झाली आणि बांगलादेशच्या गणभवतनात आंदोलनकर्त्यांनी घुसखोरी केली. हसीना यांच्या बांगलादेशातल्या पलायनानंतर त्यांनी राजकीय आश्रयासाठी भारताची वाट धरली.
देश सोडण्यसाठी बांगलदेशच्या आर्मीने हसीना यांना लष्करी हेलिकॉप्टर दिलं. त्या हेलिकॉप्टरच्या मदतीने हसीना यांनी आपलं सरकारी निवासस्थान सोडलं. त्या थेट पोहोचल्या बांगलादेशच्या आर्मी एअरबेसवर, जिथून बांगलादेश हवाई दलाच्या C- 130J एअरक्राफ्टने थेट भारताच्या दिशेनं कूच केलं.
शेख हसीना यांच्या एअरक्राफ्टचा कोड होता AJAX1431. या विमानात बांगलादेशातून पलायन केलेल्या शेख हसीना असल्याचं समजल्यावर
advertisement
फ्लाईटट्रेडरवर हे विमान सर्वाधिक ट्रॅक केलं गेलं.
सोमवारी दुपारी तीन साडेतीनची वेळ होती, भारतीय वायुसेनेच्या रडारने बांगलादेशातून कमी उंचीवरुन जाणाऱ्या या एअरक्राफ्टला डिटेक्ट केलं. या एअरक्राफ्टला भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी आपल्या अधिकाऱ्यांकडून दिली गेली.
बांगलादेशातली अस्थिरता आणि हसीना यांचं पलायन याची पूर्ण कल्पना असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी या प्रवासादरम्यान पूर्ण खबरदारी घेतली. भारताचे एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जातीने या ऑपरेशनवर नजर ठेवली. सगळ्या घडामोडींची माहिती चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल जॉन्सन मॅथ्यू यांना दिली जात होती.
advertisement
या एअरक्राफ्टला भारतातल्या लँडिंगला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा चोख होती. पश्चिम बंगालमधल्या हाशिमारा एअरबेसवरील 101 स्क्वॉड्रनमधली दोन राफेल विमानं तैनात करण्यात आली जी बिहार आणि झारखंड यांच्या पट्ट्यात गस्त घालत होती. अखेर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास शेख हसीना यांचं एअरक्राफ्ट गाझियाबाद जवळच्या हिंडन एअरबेसवर उतरलं.
हसीना यांची एअरबेसवर भेट घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल स्वतः उपस्थित होते.
advertisement
याच एअरबेसवर अजित दोवाल आणि शेख हसीना यांची जवळपास एक तास मिटींग सुरु होती. यानंतर अजित दोवाल यांनी या संपूर्ण घडामोडींची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना दिली.
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार शेख हसीना यांना सध्या दिल्लीजवळ सुरक्षित ठिकाणी ठेवलं गेलंय.
advertisement
या दरम्यान शेख हसीना आपल्या मुलीला, सायमा वाजेद हिला भेटण्याचाही शक्यता आहे. सायमा वाजेद या दक्षिण पूर्व आशियासाठी WHO च्या प्रादेशिक संचालक म्हणून काम करतात.
पॉलिटिकल असायलम म्हणजे काय?
शेख हसीना या भारतातून युके ला जाण्याची शक्यता आहे, तिथे त्यांनी राजकीय आश्रयासाठी अर्जही केल्याची माहिती मिळत आहे. हसीना यांची बहिण शेख रेहाना या ब्रिटनच्या नागरिक आहेत. तर रेहाना यांची कन्या ट्युलिप सिद्दीक या युकेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार आहेत. ब्रिटन सरकारकडून हसीना यांच्या राजकीय आश्रयाच्या अर्जावर निर्णय येईपर्यंत त्या भारतातच थांबतील असा अंदाज आहे.
advertisement
पण हसीना यांच्या निमित्ताने राजकीय आश्रय किंवा पॉलिटिकल असायलम हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. ज्या राजकीय नेत्यांना आपल्या देशात असुरक्षित वाटतं, अशा नेत्यांसाठी इतर देशांनी संरक्षणाची हमी देणं आणि त्यांना आपल्या देशात आश्रय देणं म्हणजे पॉलिटिकल असायलम. यूके सरकारच्या नियमांनुसार ज्या नेत्यांना असा आश्रय हवा आहे, त्यांना आधी अर्ज करणं बंधनकारक आहे. ज्यांनी स्वदेशातून पलायन केलं आहे किंवा देशातल्या स्थिरतेमुळे जे नेते आपल्या देशात परत जाऊ शकत नाहीत असे नेते राजकीय आश्रयासाठी अर्ज करु शकतात.
मराठी बातम्या/विदेश/
Dnyanada Show : शेख हसीना भारतात कशा आल्या? लष्करी ऑपरेशनची Inside Story, सांगतेय ज्ञानदा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement